प्राण जाये, पण होर्डिंग न जाये !! ऍड. रोहित एरंडे. ©
प्राण जाये, पण होर्डिंग न जाये !! ऍड. रोहित एरंडे. © बेकायदा वाहतूक असो, बेकायदा बांधकामे असोत का आता बेकायदा प्लेक्स, आपल्याकडे एखाद-दुसरा बळी गेल्याशिवाय प्रशासन देवतेला जाग येत नाही की काय असा प्रश्न पडतो. काल मुंबई- घाटकोपर येथील दुर्दैवी घटनेत वादळी वाऱ्यासह होणाऱ्या पावसापासून बचाव करण्यासाठी आडोशाला थांबलेल्या व्यक्तींच्या अंगावर होर्डिंग कोसळून १४ लोक बळी पडले आणि ७० लोक जखमी झाले. अशीच घटना मागील वर्षी किवळे येथे घडली होती आणि त्यात ५ जणांनी आपले प्राण गमावले. २०१८ सालच्या अश्याच दुर्दैवी घटनेत पुणे येथील जुना बाजार चौकात भर दुपारी अनधिकृत होर्डिंग कोसळून २ जणांनी आपले प्राण गमावले आणि ७ जण जखमी झाले. या लोकांच्या मृत्यूस कोण जबाबदार धरणार ? अश्या फलकांचे स्ट्रक्चरल ऑडिट होते का ? आणि ते करण्याची जबाबदारी कोणाची ? ,जागा मालक ,होर्डिंग कॉन्ट्रॅक्टरची का वेल्डर -फॅब्रिकेटरची ? असे प्रश्न आता उपस्थित झाले आहेत आणि राजकीय आरोपांच्या फैरीही झडायला लागल्या आहेत. ३६५ दिवस अभिनंदन ते सांत्वनपर अश्या वेगवेगळ्या कारणांनी शहरभर लावलेल्या बेकायदा प्लेक्स मुळे शहराचे सौं