एकत्र केलेल्या फ्लॅटसाठी किती मेंटेनन्स घ्यावा ? - ऍड. रोहित एरंडे ©
एकत्र केलेल्या फ्लॅटसाठी किती मेंटेनन्स घ्यावा ? नमस्कार. आमच्या सोसायटीमध्ये आमच्यासारखे २० एक सभासद असे आहेत ज्यांनी २ फ्लॅट एकत्र केले आहेत. बिल्डरनेच तसे करून दिले आहेत. मात्र करारनामे वेगळे आहेत. पण असे दोन फ्लॅट घेऊन एकत्र करून त्यात एकच कुटुंब रहात असेल कमिटीचे म्हणणे आहे कि मेंटेनन्स २ फ्लॅटचाच घ्यावा लागेल आणि त्यासाठी ते कायदेशीर सल्ला घेणार आहेत. तर तर सोसायटीने मेंटनन्स एकाच फ्लॅटचा घ्यावा कि दोनचा, याबाबत जनरल बॉडीने एकच मेंटेनन्स घ्यायचा ठरविला तर ? कमिटीचे म्हणणे बरोबर आहे का आणि त्यांना कायदेशीर सल्ला घेता येईल का ? एक वाचक. पुणे सोसायटी आणि सभासद ह्यांच्यामधील वादांचे मूळ कारण हे बहुतेक वेळा आर्थिक विषयाशी संबंधित असते. आपण एकात एक अनेक प्रश्न विचारले आहेत आणि त्याचे उत्तर थोडक्यात द्यायचे प्रयत्न करतो. आपल्यासारखे प्रश्न अनेक ठिकाणी दिसून येतात. बऱ्याचदा लोकांना हे लक्षात येत नाही कि कायदा आपल्याला आवडेल असा असतोच असे नाही. बिल्डर कडून फ्लॅट घेताना जेव्हा २ स्वतंत्र करार केले याचाच अर्थ ते मंजूर नकाशावरती २ वेगळे फ्लॅट्स म्हणून दाखविले आहेत आणि त्यामुळे अश्