सभासदांचे कौटुंबिक वाद पुनर्विकास थांबवू शकत नाहीत. ऍड. रोहित एरंडे ©
सभासदांचे कौटुंबिक वाद पुनर्विकास थांबवू शकत नाहीत. ऍड. रोहित एरंडे © आमच्या सोसायटीची पुनर्विकास प्रक्रिया नियमाप्रमाणे सुरु होऊन डेव्हलपरची देखील बहुमताने निवड झाली आहे. परंतु २ सभासद असे आहेत कि फ्लॅटची मालकी कोण यामध्ये वारसांमध्ये वाद चालू आहेत आणि एका सभासदाने तर वाटपाचा दावा केला आहे. परंतु या वादामामुळे हे सभासद कशावरही सही करायला तयार नाहीत आणि फ्लॅटचा ताबा द्यायलाही तयार नाहीत. तर अश्या सभासदांविरुध्द काय करता येईल ? कमिटी सदस्य, पुणे पुनर्विकास (रिडेव्हलपमेंट) आणि विरोध या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. हा निर्णय पारदर्शकपणे आणि आपापल्या गरजांचा साधक बाधक विचार करून घ्यायचा असतो यात काही शंका नाही. परंतु तो निर्णय घेणे आणि तो प्रत्यक्ष अंमलात आणणे या मधले अंतर किती असेल हे काही सांगता येत नाही, याच्याशी या विषयावर काम करणारे लोक सहमत होतील. पुनर्विकासाला विरोध करण्याची अनेक कारणे असतात. परंतु अशा विरोधी या मानसिकतेला न्यायालयांनी आपली अनेक निकालांमधून चपराक लगावताना नमूद केले आहे कि सोसायटी जनरल बॉडी सर्वोच असते आणि जनरल बॉडीने कायदेशीर पध्दतीने घेतलेला निर