Posts

Individual disputes, particularly disputes regarding additional benefits or amenities, cannot ordinarily be permitted to indefinitely obstruct redevelopment - Hon. Bombay High Court : Adv. ROHiT ERANDE ©

  Can a Minority Member Hold Up Society Redevelopment? Hon. Bombay High Court reiterates that individual disputes cannot indefinitely stall collective redevelopment  Redevelopment of cooperative housing societies frequently becomes contentious when one or a few members refuse to cooperate with a redevelopment proposal approved by the General Body. The Redevelopment disputes are converting  30-40 years friends into foes ! What is required amongst the members is Harmony amongst the members. Generally (saving genuine exceptions)  the basis of all these disputes is an Ego and there are certain hidden elements which try to inflate the ego and members end up in court litigation by losing time, money and mental peace !! As far as the Co.Op. Housing Societies are concerned (and many are eagerly waiting for the law to get settled for Apartment Associations !), the Law on Redevelopment is almost settled meaning thereby the Majority decision taken in accordance with Law s...

The Breaking Point: When Forcing a Spouse Away Becomes Marital Cruelty : Adv. Rohit Erande ©

  The Breaking Point: When Forcing a Spouse Away Becomes Marital Cruelty :  Adv. Rohit Erande ©     Case Details : (parties names have not been disclosed -  CMA No. 2942 of 2026 , decided on 27 August 2026,  (Before :  THE HON'BLE MS. JUSTICE P.T. ASHA and THE HON'BLE MRS.JUSTICE N. MALA) the Moot Question :    The important question of matrimonial law: when can repeated withdrawal from the matrimonial home and insistence upon separate residence amount to “cruelty” under Section 13(1)(ia) of the Hindu Marriage Act, 1955? Facts in nutshell :  1. The case arose from a marriage solemnized in June 2019. The husband alleged that his wife repeatedly left the matrimonial home and stayed at her maternal home for months, despite repeated requests to return. He further alleged that she insisted upon a separate residence. Although the husband initially established a separate rented house and subsequently shifted to another residen...

सायबर फसवणुकीत बँकेचीही जबाबदारी - ग्राहकाच्या खात्यातून रक्कम गेली म्हणून बँक आपली जबाबदारी झटकू शकत नाही. ॲड. रोहित एरंडे©

  सायबर फसवणुकीत बँकेचीही जबाबदारी  ग्राहकाच्या खात्यातून रक्कम गेली म्हणून बँक आपली जबाबदारी झटकू शकत नाही ॲड. रोहित एरंडे © सोयी तितक्या गैरसोयी म्हणतात तसेच सध्या डिजिटल बँकिंगच्या वाढत्या वापराबरोबर सायबर फसवणुकीच्या प्रकारणांमध्येही खूप वाढ झाली आहे. बऱ्याचदा "caught  unaware "   या  परिस्थितीत असे फ्रॉड होतात आणि आपल्याला काही समजायच्या  आत पैसे गेलेले असतात. तर समजा ग्राहकाने OTP वापरून एखाद्या व्यवहारास मान्यता दिली असेल, तरी बँकेची जबाबदारी पूर्णपणे संपते का ? असा  महत्त्वाचा प्रश्न नागपूर जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगासमोर नुकताच आला. या केसच्या फॅक्टस महत्वाच्या असून त्यामधून आपणही काय काळजी घ्यायला पाहिजे ते आपसूक दिसून येते.  तक्रारदार महिलेला ८ जानेवारी २०२३ रोजी एका व्यक्तीने फेडेक्स (FedEx) या जगप्रसिध्द कुरिअर कंपनीचा  अधिकारी असल्याचे भासवून फोन केला आणि  तिच्या नावाने परदेशी पार्सल आले असून त्यामध्ये पासपोर्ट, ATM कार्ड, ३०० ग्रॅम गांजा  आणि लॅपटॉप असल्याचे खोटेच सांगितले आणि पुढे  तिला मुंबई पोलिसांश...

ज्यांनी सांभाळ केला त्यांनाच इस्टेटीमध्ये हक्क मिळतो ? - ॲड. रोहित एरंडे © #लोकमत

ज्यांनी सांभाळ केला त्यांनाच इस्टेटीमध्ये हक्क मिळतो?  व्यवहार आणि नातेसंबंध यामध्ये गल्लत करून चालत नाही. काही लोकांना आपला स्वार्थ कसा साधायचा हे चांगलेच माहिती असते, नाही का ? ॲड. रोहित एरंडे. ©   "माझ्या मैत्रिणीने आणि तिच्या नवऱ्याने मैत्रिणीच्या आई-वडिलांना सांभाळले आहे. तिचे बहीण आणि भाऊ पैशाने खूप श्रीमंत आहेत मात्र ते कधीही वेळेला मदतीला आले नाहीत. वडिलांचे आजारपण, खर्च मैत्रिणीनेच केले, प्रसंगी आम्ही देखील मदत केली आहे. काही महिन्यांपूर्वी मैत्रिणीचे वडील अचानक गेले. आता आजारी आईला देखील मैत्रीणच सांभाळत आहे, मात्र काही दिवसांपूर्वी बहीण भावांनी वकीलांकडून नोटीस पाठवून मैत्रिणीच्या वडिलांचं मिळकतीमध्ये हक्क मागितला आहे. खरे तर मैत्रिणीने आणि तिच्या आई नवऱ्यानेच तिच्या आई वडिलांचा सर्वतोपरी सांभाळ केल्याने तिच्या बहीण-भावाला हक्क राहतो का ? मैत्रिणीने जी काही सेवा शुश्रूषा केली त्यामुळे तिलाच सगळा किंवा जास्त हिस्सा मिळायला हवा ना ? एक वाचक, नाशिक   सामान्य लोकांची डॉक्टर, ज्योतिषी आणि वकील यांचेकडून एक नैसर्गि...

डॉक्टरांवरील हल्ल्याचा सामाजिक रोग : ॲड. रोहित एरंडे

 डॉक्टरांवरील   हल्ल्याचा सामाजिक रोग   ॲड. रोहित एरंडे   रुग्णाचा जीव वाचविण्यासाठी डॉक्टर रात्रंदिवस काम करतात. परिचारिका रुग्णाची सेवा करतात. आपत्कालीन विभागात डॉक्टर स्वतःच्या सुरक्षिततेची पर्वा न करता गंभीर रुग्णावर उपचार करतात. परंतु उपचाराच्या प्रक्रियेत एखादी अपेक्षा पूर्ण झाली नाही, रुग्णाला तातडीने बेड मिळाला नाही किंवा उपचाराचा अपेक्षित परिणाम झाला नाही, की डॉक्टरांवर हात उचलण्याची प्रवृत्ती वाढत आहे. ही केवळ कायदा-सुव्यवस्थेची समस्या नाही; ती संपूर्ण आरोग्यव्यवस्थेच्या सुरक्षिततेशी संबंधित समस्या आहे. डोंबिवलीतील शास्त्रीनगर रुग्णालयात जुलै २०२६ मध्ये डॉक्टरांवर झालेल्या हल्ल्याचे प्रकरण  ताजे असतानाच आता पालघर मधील दुसरे प्रकरण उघडकीस आले आहे. योगायोगाने दोघेही   शिवसेना पक्षाशी संबंधित होते. अर्थात कोणता पक्ष /संघटना आहे हे मुद्दे गौण आहेत, आपण पाहिजे तेव्हा कायदा हातात घेऊ शकतो हि प्रवृत्ती धोकादायक आहे. नगरसेवक रमेश सुखऱ्या म्हात्रे आणि त्यांच्या साथीदारांवर डॉक्टर व रुग्णालयातील वैद्यकीय कर्मचाऱ्यांवर मारहाण केल्याचा आरोप झाल...

"कष्टाचे काम करताना हृदयविकाराने मृत्यू आल्यास इन्शुरन्स कंपनी विमा विमा रक्कम देण्यास बांधील ... ॲड. रोहित एरंडे ©

"कष्टाचे काम करताना हृदयविकाराने मृत्यू आल्यास इन्शुरन्स कंपनी विमा विमा रक्कम देण्यास बांधील ... ॲड. रोहित एरंडे © भारतातून परदेशामध्ये जसे  आय.टी. क्षेत्रामधून नोकरीसाठी लोकं जातात त्याचप्रमाणे पूर्वीपासून आखाती देशांमध्ये मजूर किंवा शारीरिक कष्टाची कामे असलेल्या नोकऱ्यांसाठी देखील बरीच लोकं भरती होतात. या लोकांचे कामाचे स्वरूप जास्त कष्टदायक आणि तणावपूर्ण असते. अशा लोकांसाठी अर्थातच विमा घेणे गरजेचे असते आणि त्यामध्ये "अपघाती मृत्यु" झाल्यास नुकसानभरपाई मिळण्यासाठी विशेष करून विमा घेतला जातो. मात्र  जर असे तणावपूर्ण कामाचे स्वरूप असताना काम करतानाच एखाद्या कामगाराचा  हृदयविकाराने मृत्यू   झाल्यास असा मृत्यू नैसर्गिक म्ह्णून विमा क्लेम नाकारायचा का अशा विशेष पॉलिसीप्रमाणे अपघाती मृत्यु म्हणून क्लेम द्यायचा या वेगळ्या  प्रश्नावर  ओडिशामधील बेहरामपूर ग्राहक आयोगाने नुकताच एक    महत्वपूर्ण निकाल दिला आहे.  या केसची थोडक्यात पार्श्वभूमी बघू यात.   श्री. बिजॉय गोचावत या  व्यक्तीस ओमान मध्ये गवंडी कामाची नोकरी मिळते आणि तिकडे ...

वाहनाचा दरवाजा निष्काळजीपणे उघडणे अयोग्यच: दिल्ली उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय ॲड. रोहित एरंडे ©

  वाहनाचा दरवाजा निष्काळजीपणे उघडणे अयोग्यच: दिल्ली उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय ॲड. रोहित एरंडे ©  रस्त्यावर वाहन चालवताना चालकाने केवळ स्वतःच्या वाहनाच्या हालचालींकडे लक्ष देणे पुरेसे नसते, तर आजूबाजूच्या वाहतुकीचीही योग्य ती खबरदारी घेणे आवश्यक असते. विशेषतः रस्त्याच्या कडेला किंवा वाहतुकीच्या मार्गात वाहनाचा दरवाजा उघडताना मागून अथवा बाजूने येणाऱ्या वाहनांची पाहणी करणे ही चालकाची मूलभूत जबाबदारी आहे आणि त्यात कसूर झाल्यास अनवस्था प्रसंग ओढवू शकतो.    दिल्ली उच्च न्यायालयाने नुकतेच एका याचिकेवर निर्णय देताना नमूद केले की, आजूबाजूला न बघता एकदम वाहनाचा दरवाजा उघडल्यामुळे मागून येणाऱ्या व्यक्तीला अपघात  अपघात होणे  हे स्पष्ट व गंभीर निष्काळजीपणाचे कृत्य आहे आणि त्याबद्दल नुकसान भरपाई देण्यास   संबंधित वाहनचालक किंवा विमा कंपनी  बांधील आहेत.  या केसची पार्श्वभूमी थोडक्यात बघू यात.  20 ऑगस्ट 2024 रोजी दुपारी सुमारे 3.30 वाजता दिल्लीस्थित २१ वर्षीय रोशन कुमार साहू हे मोटरसायकलवरून   असता  त्यांच्या पुढे चाललेल्य...

बसायचा पाट मुलांना देताय ? - ॲड. रोहित एरंडे ©

 "मुलांना, आई-वडिलांच्या स्वकष्टार्जित  घरामध्ये आई-वडिलांच्या  मर्जीवरच राहता येते" #लोकमत स्वतःच्या घरातून, मुलांना बाहेर काढण्याचा आई-वडिलांना अधिकार  ऍड. रोहित एरंडे © "जगी सर्व सुखी असा कोण आहे ?" रामदासस्वामींचे हे बोल कोर्ट प्रॅक्टिसमध्ये पदोपदी अनुभवायला येतात. प्रत्येकालाच कमी अधिक प्रमाणात शारीरिक, मानसिक, आर्थिक त्रास असतात. मात्र  आयुष्याच्या ज्या  टप्प्यावर मुले सेटल झालेली असतात, नातवंडांबरोबर  मजेत वेळ घालवायचा, अश्या वेळी मात्र काही आई वडिलांवर स्वतःच्या पोटच्या पोरांबरोबर "उभा दावा" मांडावा लागतो. आपण बहुतेक जण जन्मापासून आई-वडिलांबरोबरच  राहतो, ते घर कायद्याने कोणाच्याही नावे असले तरी ते आपण "आपलेच घर आहे" असे म्हणत असतो. मात्र काही वेळा असे प्रसंग येतात की आई-वडिलांना पोटच्या मुलांना सांगवे लागते की घरातून चालते व्हा, हे घर आमचे आहे ! पोटच्या poranshi कोर्टात असे भांडण्याची वेळ ज्या आई-वाडियांवर येते त्यांनाच याचे दुःख विचारा.  हे लिहिण्याचे कारण म्हणजे नुकतेच ४ ऑगस्ट २०२६ रोजी दिलेल्या एका निर्णयामध्ये  मा. सर्वोच्च न...

आले रे उत्सव , पण कायदे सांभाळा : ॲड. रोहित एरंडे ©

  आले रे उत्सव , पण कायदे सांभाळा :   ॲड. रोहित एरंडे ©   जाणते  -अजाणतेपणे कायदा मोडला गेल्यास "कायद्याचे अज्ञान" हा कधीही बचाव  होऊ शकत नाही. हे सर्व सांगण्याचे कारण म्हणजे गणेशोत्सव, दहीहंडी   अवघ्या काही  दिवसांवर येऊन  ठेपले आहेत. कार्यकर्त्यांच्या बैठका,   ढोल-ताशांचा सराव  देखील सुरु झाले आहेत . परंतु  हे सर्व करताना उत्साहाच्या भरात आपल्या हातून कायद्याचा भंग तर होत  नाहीना ह्याचे भान   राखणे गरजेचे आहे.    गेल्या काही काळात  सर्व धर्मीय सण -समारंभांमुळे होणाऱ्या  त्रासांविरुद्ध काही जनहित याचिका दाखल केल्या गेल्या आणि त्यावर मुंबई उच्च न्यायालायने, सर्वोच्च न्यायालयाच्या पूर्वीच्या निकालांचा आधार घेऊन, दिलेले निकाल  खूपच  स्पष्ट आहेत.  दर वर्षी कोणी ना कोणीतरी ह्या संदर्भात उच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावतोच.. कुठल्याही धर्माचा सण समारंभ असो, प्रमुख आक्षेप असतो ध्वनी प्रदुषण आणि मंडप. या बाबत न्यायालयीन निर्णय "धर्मनिरपेक्ष" आहेत. ध्वनी प्रदुषणाबाबत मुंबई  उच्च न्यायालयान...

" खड्ड्यात खरोखर जग जगते". ॲड. रोहित एरंडे ©

 " खड्ड्यात खरोखर जग जगते".: ॲड. रोहित एरंडे © एखादा बळी गेल्याशिवाय आपल्याकडे यंत्रणांना जाग येत नाही असे म्हणतात. पुण्यामध्ये मागील आठवड्यात खड्ड्यामुळे एका १० वर्षांच्या मुलाला आपला जीव गमवावा लागला तर तर मागील महिन्यात मुंबई-नाशिक महामार्गावर भारंगी नदीच्या पुलाजवळ पडलेल्या मोठ्या खड्ड्यामुळे ठाणे महापालिकेच्या आपत्ती प्रतिसाद दलाचे (TDRF) जवान विकास लहू गोरे यांचा दुचाकी घसरून झालेल्या अपघातात मृत्यू झाला. आपत्कालीन परिस्थितीत अनेकांचे प्राण वाचवणारे हे जवानच स्वतः जीवघेण्या खड्ड्याचे बळी ठरले या सारखा दुसरा दैवदुर्विलास नसेल. अशी अनेक उदाहरणे आहेत. रस्त्यात खड्डे आहेत की खड्ड्यात रस्ते अशी काही ठिकाणी परिस्थिती आहे. " मरणात खरोखर जग जगते, आधी मरण अमरपण ये मग ते" असे राजकवी भा.रा. तांबे म्हणून गेले आहेत. परंतु एकंदरीतच सध्या रस्त्यांची जी काही चाळण झाली आहे आणि जिकडे तिकडे खड्डेच खड्डे झाले आहेत, त्यावरून वरील ओळींमध्ये भा. रा. तांब्यांची माफी मागून, थोडासा बदल करावासा वाटतो '" खड्ड्यात खरोखर जग जगते, आपोआप अपघाती मरण ये मग ते".  आपल्या राज्य...

नावात काय आहे ? विवाहानंतर महिलांना नाव बदलणे कायद्याने अनिवार्य असते का ? - ॲड. रोहित एरंडे ©

नावात काय आहे ? विवाहानंतर महिलांना नाव बदलणे कायद्याने अनिवार्य असते का ? डिव्होर्सनंतर नाव बदलता येते का ? ॲड. रोहित एरंडे © विख्यात इंग्रजी  लेखक, नाटककार  विल्यम शेक्सपियर यांच्या 'रोमियो आणि ज्युलियेट' (Romeo and Juliet) या अजरामर शोकांतिकेमधील "नावात काय आहे?, गुलाबाला आपण दुसऱ्या कोणत्याही नावाने बोलावले तरी त्याचा सुगंध असाच गोड राहील" हे वाक्य सर्वांना माहिती असेलच.   तर काही दिवसांपूर्वी , लग्नानंतर महिलांनी माहेरचेच संपूर्ण  नाव    ठेवण्याची  वाढती प्रवृत्ती आणि भविष्यात निर्माण होऊ शकणाऱ्या कायदेशीर अडचणी  या बाबत एक लेख वाचण्यात आला आणि हा मेसेज व्हॅट्सऍपवर खूप व्हायरल झाला आणि त्यावरील  चर्चेत लोकांचा बराच डेटा खर्ची पडला. यामध्ये मैल विरुद्ध पुरुषी संस्कृती असेही स्वरूप प्राप्त झाल्याचे दिसून आले आणि एकंदरीतच बऱ्याच ठिकाणी या विषयावर तिखट चर्चा झाल्याचे दिसून आले. या विषयावर कायदेशीर दृष्टीने लेख लिहिण्याची आमचे ग्रुप कॅप्टन मुकुंदराव लेले यांचेकडून विचारणा झाली आणि म्हणून  हा लेखन प्रपंच.    हा विषय महत्त्व...