बिल्डरला पार्किंग विकता येते का ? - ऍड. रोहित एरंडे ©
बिल्डरला पार्किंग विकता येते का ? ऍड. रोहित एरंडे © सोसायटीमध्ये फ्लॅट घेताना 'पार्किंग' हा जिव्हाळ्याचा विषय असतो. बिल्डर फ्लॅट बरोबर पार्किंग देखील विकू शकतो की नाही ह्या बद्दल बरेचसे गैरसमज दिसून येतात. ह्या बद्दलची थोडक्यात कायदेशीर माहिती आपण बघूया. ह्या बद्दलची कायदेशीर माहिती थोडक्यात आपण बघूया. पार्किंगचे २ प्रकार साधारणपणे कायद्याने ओळखले जातात. १. सामाईक (कॉमन /ओपन)पार्किंग आणि स्टील्ट पार्किंग आणि २. कव्हर्ड / गॅरेज पार्किंग महाराष्ट्र ओनरशिप फ्लॅट्स ऍक्ट (मोफा) १९६३ हा आद्य कायदा आणि नुकताच पारित झालेला रेरा कायदा यांच्यामध्ये बिल्डर-प्रमोटर ह्यांची कर्तव्ये , जबाबदाऱ्या आणि फ्लॅट ग्राहकांचे हक्क-अधिकार आणि ह्यांचा उहापोह केलेला आढळून येतो. त्यामध्ये कॉमन जागा, ऍमिनिटीज ह्यांचाही समावेश होतो. रेरा कायदा जरी पारित झाला असला तरी, मोफा कायदा त्याने रद्द झालेला नाही आणि मोफा कायद्याच्या तरतुदी जो पर्यंत रेरा कायद्याच्या विरुद्ध होत नाहीत तो पर्यंत त्या ...