अमर्याद प्राणिप्रेमाला कायद्याची वेसण. - ऍड. रोहित एरंडे. ©
अमर्याद प्राणिप्रेमाला कायद्याची वेसण. ॲड . रोहित एरंडे © आमच्या सोसायटीमध्ये एक सभासद त्यांच्या गॅलरीमध्ये कबुतरांना खाण्यासाठी दाणे, चपातीचे तुकडे आणि पाणी ठेवतात. त्यामुळे आम्ही खाली राहणाऱ्या सभासदांच्या गॅलरीमध्ये कबुतरांची विष्ठा, पिसे , अन्नाचे कण अश्या गोष्टी सारख्या पडतात आणि याचा आम्हाला खूप त्रास होतो आहे आणि माझ्या वयोवृद्ध आईला श्वासाचे विकार सुरु झाले आहेत. सभासद महाशयांना हे थांबवण्याची विनंती केली तर तुम्हाला भूतदया नाही, हे पुण्याचे काम आहे आणि त्यामुळे आम्ही काही हे थांबवणार नाही, त्यामुळे तुम्हाला काय करायचे ते करा अशी धमकी देतात. सोसायटीकडे तक्रार करूनही काही उपयोग झाला नाही. तरी याबद्दल काय करता येईल. एक वाचक, पुणे. आपल्यासारखाच प्रश्न काही वर्षांपूर्वी मुंबई उच्च न्यायालयापुढे उपस्थित झाला होता आणि "आपल्या वर्तणुकीमुळे शेजारच्यांना त्रास होऊ नये" या नागरिकशास्त्राच्या मूलभूत तत्वाचा पुनरुच्चार करून उच्च न्यायालयाने अशाच एका प्राणिमित्रास कायद्य...