७/१२ किंवा प्रॉपर्टी कार्डने मालकी ठरत नाही, ॲड. रोहित एरंडे.©
७/१२ किंवा प्रॉपर्टी कार्डने मालकी ठरत नाही, ॲड. रोहित एरंडे.© आमच्या आजीच्या २ प्रॉपर्टी होत्या. आजीला आमचे वडील धरून अजून २ मुले आणि २ मुली होत्या. आजीने कोणतेही कायदेशीर मृत्युपत्र केलेले नव्हते. मात्र एका कागदावर ज्यावर आजीची सही नव्हती आणि २ साक्षीदारांची देखील सही नव्हती अश्या एका कागदाला मृत्युपत्र बनवून वडिलांच्या दोन्ही भावांनी प्रॉपर्टी कार्डवर त्यांची नावे लावून घेतल्याचे आमच्या नुकतेच लक्षात आले आणि आता प्रॉपर्टी कार्डाने ते एकटेच मालक झाले सांगत आहेत आणि आमच्या ताब्यातील जागा खाली करून मागत आहेत तर आता काय करता येईल ? एक वाचक, पुणे. आपल्या प्रश्नामध्ये अनेक महत्वाचे पैलू आहेत, ज्याचा सामना आपल्यापैकी अनेक लोकांना करावा लागतो ते म्हणजे मृत्यूपत्राची वैधता, प्रॉपर्टी कार्डाने मालकी का ठरत नाही आणि जागेच्या ताब्याचे महत्व. सर्व प्रथम मृत्युपत्राची वैधता बघूयात. मृत्यूपत्र कायदेशीर ठरण्यासाठी मृत्यूपत्रावर दोन सज्ञान साक्षीदारांनी सही करणे गरजेचे आहे. मृत्यूपत्र करणाऱ्याने आणि दोन साक्षीदारांनी एकमेकांसमोर मृत्यूपत्रावर सही करणे गरजेचे ...