गृहनिर्माण सोसायट्यांना प्राप्तिकरात "सर्वोच्च" दिलासा . सोसायटी आणि स्पोर्ट्स क्लब यांसाठी महत्वाचे असणारे म्युच्युऍलिटी तत्व : ऍड रोहित एरंडे. ©
गृहनिर्माण सोसायट्यांना प्राप्तिकरात "सर्वोच्च" दिलासा . सोसायटी आणि स्पोर्ट्स क्लब यांसाठी महत्वाचे असणारे म्युच्युऍलिटी तत्व : ऍड. रोहित एरंडे. © सोसायटी आणि सभासद ह्यांच्यामधील वाद हे बहुतांशी वेळा ट्रान्स्फर फी (हस्तांतरण शुल्क), मेंटेनन्स शुल्क (मासिक देखभाल खर्च) आणि नॉन - ऑक्युपन्सी चार्जेस ( ना-वापर शुल्क) या आर्थिक कारणांशीच निगडित असतात. ह्या बाबतीतला कायदा आता "सेटल" झाला आहे की ट्रान्सफर फी हि जास्तीत जास्त २५,०००/- इतकीच घेता येते. तसेच सोसायटीमध्ये मेंटेनन्स किती असावा हे कायदा सांगत नाही, पण मेंटेनन्स सर्वांना समान असावा आणि ना-वापर शुल्क हे मेंटेनन्स शुल्काच्या १०% इतकेच घेता येते. परंतु जेव्हा अश्या आणि कॉमन फंड इ. रकमा सोसायट्यांना सभासंदाकडून मिळतात तेव्हा त्यांच्यावर सोसायट्यांनी परस्परसंबंधांच्या म्हणजेच डॉक्टरीन ऑफ म्युच्युऍलिटी (doctrine of mutuality) या तत्वानुसार इन्कम टॅक्स भरणे कायद्याने गरजेचे आहे कि नाही या संदर्भात सोसायट्यांमध्ये संभ्रम असल्...