मेंटेनन्स आणि ना-वापर शुल्क ह्यांची गल्लत नको. - ऍड. रोहित एरंडे
मेंटेनन्स आणि ना-वापर शुल्क ह्यांची गल्लत नको. मी मुंबईला राहतो. त्यामुळे माझा जो एक फ्लॅट पुण्यामध्ये आहे तो मी न वापरता कुलूपबंद ठेवला आहे. तरीही सोसायटी माझ्याकडून मेंटेनन्स आणि ना वापर शुल्क मागत आहे ? ह्याबद्दल मार्गदर्शन करावे. एक वाचक, मुंबई 'प्रत्येक सभासदाला मेंटेनन्स हा द्यावाच लागतो, पण "ना-वापर" शुल्क हे द्यावे लागते असे नाही, ते जागेचा वापर कोण करते ह्यावर अवलंबून आहे', ह्या सोप्या सूत्रात आपल्या प्रश्नाचे उत्तर देता येईल. बऱ्याचदा ना-वापर शुल्क म्हणजेच non occupancy charges ह्या संज्ञेवरून अनेकांची गल्लत होते. कमिटीला वाटते कि कि फ्लॅट बंद ठेवला असेल म्हणजेच , फ्लॅट कुलूप बंद असला म्हणून "ना-वापर" शुल्क घ्यावे, तर सभासदांची धारणा असते कि मी फ्लॅट बंद ठेवला आहे, सोसायटीच्या कुठल्याही सोयी वापरात नाही त्यामुळे सोसायटीचे कुठलॆच पैसे देण्यास बांधील नाही. मात्र वरील दोन्ही धारणा का चुकीच्या आहेत ते आपण थोडक्यात बघू. ना-वापर शुल्क कधी आणि किती घेता येते ? एखाद...