Posts

Showing posts from December 26, 2017

परस्पर संमतीने घटस्फोट : ६ महिन्यांचा कालावधी माफ, पण कधी ?

परस्पर संमतीने घटस्फोट :  ६ महिन्यांचा कालावधी माफ, पण कधी ? Adv. रोहित एरंडे लग्नाच्या गाठी वर ठरतात आणि काहीजणांच्या त्या इथेच सोडवाव्या लागतात असे घटस्फोटाबद्दल म्हंटले जाते. हल्लीच्या काळात जर आपण विचार केला तर आपल्या ओळखीच्या- नात्यातील कुठल्यातरी घरामध्ये घटस्फोटाची एखादीतरी केस दिसेल एवढे ह्याचे प्रमाण वाढले आहे. हिंदू  विवाह कायद्यामध्ये कोणत्या कारणाने घटस्फोट घेता येतो या-बद्दल विविध तरतुदी आहेत. एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांची चिखल फेक न करता परस्पर संमतीने म्हणजेच mutual consent ने घटस्फोट घेण्याची महत्वपूर्ण तरतूद कलम १३-ब मध्ये नमूद केली आहे. ह्या तरतुदीप्रमाणे एक वर्षापेक्षा जास्त काळ जर नवरा बायको हे एकमेकांपासून वेगळे राहत असतील आणि त्या दोघांनी उभयता त्यांचे लग्न संपुष्टात आणायचे ठरवले असेल तर  त्यांना सदरील तरतुदीखाली घटस्फोटासाठी अर्ज करता येतो. असा अर्ज केल्यानंतर ६ महिन्यांच्या कालावधीनंतर घटस्फोट मंजूर केला जातो.  हा जो ६ महिन्यांचा कालावधी आहे तो मँडेटरी आहे  ? का त्याच्या आधीच घटस्फोट मंजूर करण्याचा अधिकार  न्यायालयाला आहे का?  ह्या बद्दल मा. सर