रेफ्युज एरिया बंदिस्त करता येत नाही. - ऍड. रोहित एरंडे Ⓒ
रेफ्युज एरिया बंदिस्त करता येत नाही. आमच्या सोसायटीमधील रेफ्युज एरिया बंदिस्त करून त्याचा उपयोग सोसायटी हॉल /रिक्रिएअशन हॉल सारखा करण्याचा घाट घातला जात आहे. असे करणे भविष्यात धोकादायक ठरू शकते म्हणून त्याला आमच्यासारखे अल्पमतामधील काही सभासद विरोध करत आहोत पण बहुमताच्या जोरावर तसा ठराव पास होण्याची शक्यता आहे, तर रेफ्युज एरिया बंदिस्त करता येतो का ? काही सभासद, पुणे. सर्वात आधी रेफ्युज एरिया म्हणजे काय ह्याची माहिती करून घेऊ. सुमारे २ दशकांपूर्वी ४-५ मजली बिल्डिंग असणे म्हणजे खूप मोठी बिल्डिंग वाटायची. मात्र जस जशी लोकसंख्या वाढ आणि त्याप्रमाणात वाढू लागलेली जागांची मागणी ह्या प्रमाणे तर १० पासून ५० मजल्यापर्यंत बिल्डिंग आपल्याकडे सहजरित्या बांधल्या जाऊ लागल्या आहेत. मात्र जेवढ्या उंच बिल्डिंग तेवढे त्यांचे बाकीचे प्रॉब्लेम्स देखील तसेच मोठे. एवढ्या मोठ्या उंच बिल्डिंगमध्ये जर दुर्दैवाने आग लागल्यासारखे आपत्कालीन प्रसंग निर्माण झाले तर सर्व रहिवाश्यांना सुखरूप बाहेर पडण्यासाठी एखाद्या सुरक्...