Posts

Showing posts from July 27, 2017

आले रे उत्सव , पण कायदे सांभाळा : "कायद्याचे अज्ञान" हा कधिही बचाव होऊ शकत नाही

आले  रे  उत्सव , पण कायदे सांभाळा : "कायद्याचे अज्ञान" हा कधीही  बचाव  होऊ शकत नाही..  जाणते  -अजाणतेपणे कायदा मोडला गेल्यास "कायद्याचे अज्ञान" हा  कधीही  बचाव  होऊ शकत नाही.  हे सर्व सांगण्याचे कारण म्हणजे गणेशोत्सव, दहीहंडी   काही  दिवसांवर येऊन  ठेपले आहेत. कार्यकर्त्यांच्या बैठका,   ढोल-ताशांचा सराव  देखील सुरु झाले आहेत . परंतु  हे सर्व करताना उत्साहाच्या भरात आपल्या हातून कायद्याचा भंग तर होत  नाहीना ह्याचे भान   राखणे गरजेचे आहे.  .  गेल्या काही काळात  सर्व धर्मीय सण -समारंभांमुळे होणाऱ्या  त्रासांविरुद्ध काही जनहित याचिका दाखल केल्या गेल्या आणि त्यावर मुंबई उच्च न्यायालायने, सर्वोच्च न्यायालयाच्या पूर्वीच्या निकालांचा आधार घेऊन, दिलेले निकाल  खूपच  स्पष्ट आहेत.  दोन-तीन दिवसांपूर्वी देखील मुंबई उच्च न्यायालायने ह्याची गंभीर दाखल घेतली आहे.. त्याची थोडक्यात माहिती घेऊ.  सर्व प्रथम दही-हंडी बाबत मागील वर्षी सर्वोच्च न्यायालयाने दहीहंडी किती उंचावर लावावी आणि किती वयोगटातील मुले ह्यात सहभागी होऊ शकतात ह्या बाबत स्पष्ट आदेश दिले आहेत. आता परत सरकारने