"कितीही काळ राहिले म्हणून केअर-टेकर, वॉचमन, नोकर ह्यांना वापरायला दिलेल्या जागेत कुठलाही हक्क प्राप्त होत नाही" - मा. सर्वोच्च न्यायालय. ऍड. रोहित एरंडे ©
"कितीही काळ राहिले म्हणून केअर-टेकर, वॉचमन, नोकर ह्यांना वापरायला दिलेल्या जागेत कुठलाही हक्क प्राप्त होत नाही" - मा. सर्वोच्च न्यायालय. ऍड. रोहित एरंडे © एका अतिशय महत्वाच्या निकालाची थोडक्यात माहिती आपण ह्या लेखाच्या निमित्ताने करून घेऊ या. दुसऱ्याला मदत करणे हि आपली संस्कृती पूर्वापार चालत आलेली आहे. आपल्या जागेचा सांभाळ करण्यासाठी केअर -टेकर , वॉचमन, नोकर ह्यांना राहण्यासाठी जागा देण्याची पद्धत आपल्याकडे आहे. जेणेकरून त्यांनाहि डोक्यावर छप्पर मिळते आणि मालकांचीही सोय होते. तसेच काही वेळा आपल्या जवळच्या नातेवाईकांना, मित्रांना राहण्याच्या जागेची निकड असताना प्रेमापोटी /आपुलकीने आपण राहण्यासाठी जागा देतो. परंतु अश्या केलेल्या उपकाराची फेड जेव्हा अपकाराने केली जाते, तेव्हा नाईलाजास्तव कोर्टाची पायरी चढावी लागते ह्याचे हि केस म्हणजे उत्तम उदाहरण आहे. हिमालया व्हींट्रेड प्रा.लि. विरुद्ध मोहमद्द झाहीद (सिव्हिल अपील क्र.५७७९/२०२१) या याचिकेवर मा. न्या. अजय रस्तोगी आणि मा. न्या. अभय ओका ह्यांच्या खंडपीठाने "कितीही काळ राहिले म्हणून केअर-टेकर, वॉचमन...