अपार्टमेंटचे रिडेव्हल्पमेंट करता येतेच ! ऍड. रोहित एरंडे. ©
अपार्टमेंटचे रिडेव्हल्पमेंट करता येतेच ! ऍड. रोहित एरंडे. © आमच्या ३५ वर्षे जुन्या अपार्टमेंट असोशिएशन मध्ये १० सभासद आहेत आणि गेले काही दिवस आमच्याकडे रिडेव्हल्पमेंटचे वारे वाहायला लागले आहेत. मात्र काही सभासदांचे म्हणणे आहे कि अपार्टमेंट असेल तर रिडेव्हल्पमेंट करता येत नाही, त्यासाठी सोसायटी करावी लागेल म्हणजे बिल्डरचा हक्क राहत नाही आणि अपार्टमेन्टला काही नियमावलीच नाही. मात्र त्यासाठी काही लाख रुपये खर्च सांगितला आहे. तर रिडेव्हल्पमेंट करण्यासाठी अपार्टमेंटची सोसायटी होणे अनिवार्य आहे का ? एक वाचक, पुणे. सर्वप्रथम, एखादी गोष्ट कायद्याने करावीच लागते आणि एखादी गोष्ट कायद्याने करता येते, हा मूलभूत महत्वाचा फरक कायम लक्षात घ्यावा. आपली केस दुसऱ्या प्रकारात मोडते. यासाठी आम्ही नेहमी उदाहरण देतो कि वय वर्षे १८ आणि २१ पूर्ण झाल्यावर अनुक्रमे मुली आणि मुले कायदेशीरपणे लग्न करू शकतात, पण ह्याचा अर्थ त्या वयाचे झाल्यावर लग्न करायलाच पाहिजे असे कायदा सांगत नाही न...