Posts

Showing posts from January 4, 2023

वीज मीटर आणि कन्व्हेयन्स करून देण्याची जबाबदारी बिल्डरवर : ॲड. रोहित एरंडे ©

 प्रश्न १ आम्ही अलीकडे आमच्या तळेगाव-दाभाडे येथील सोसायटी साईट ला भेट दिली. तिथे हजर असलेल्या सोसायटी सेक्रेटरीने जर फ्लॅट मध्ये वीज हवी असल्यास रु ७५००० द्यावे लागतील असे तोंडी सांगितले   मी त्यांना एवढी रक्कम कशासाठी मागत आहात त्यावर त्यांनी  उत्तर देणे टाळले. आपण महाराष्ट्र वितरण कंपनीचे काय अटी /शर्ती आहेत याबद्दल आम्हांस मार्गदर्शन करावे ही  नम्र  विंनती   - Vikas Shivram Kelkar आपल्या प्रश्नावरून आपली बिल्डिंग साईट आहे असे दिसत आहे. त्यामुळे फ्लॅटवासीयांना वीज मीटर मिळवून देण्याची जबाबदारी हि बिल्डरवर येते. त्यासंदर्भात आपण बिल्डरकडे पाठपुरावा करा. वीज पुरवठा करण्याचे आणि त्यासंबंधीचे सर्व अधिकार हे महाराष्ट्रराज्य वीज  वितरण कंपनीकडे आहेत, त्यामुळे सेक्रेटरीने पैसे मागण्याचे काहीच कारण नाही. आपण वीज कंपनीच्या संबंधित ऑफिसमध्ये भेट द्यावी, तिथेच सर्व गोष्टींचा खुलासा होईल आणि महत्वाचे म्हणजे सोसायटी असो वा वीज कंपनी, तुमचे जे काही म्हणणे असेल ते लेखी ठेवा. तोंडी बोलाचाली उपयोगी येणार नाही.  प्रश्न ३ आमचे संकुलामध्ये १२ सोसायट्या असून या सर्व सोसायट्यांचे मिळून एक असोसिएशन आहे. सद