वडिलांच्या स्वकष्टार्जित मिळकतीमध्ये फक्त मुलींना हक्क, पण कधी ? : 'सर्वोच्च' निकाल आणि मिडीयाने लावलेला अर्थ !! ऍड. रोहित एरंडे
वडिलांच्या स्वकष्टार्जित मिळकतीमध्ये फक्त मुलींना हक्क, पण कधी ? 'सर्वोच्च' निकाल आणि मिडीयाने लावलेला अर्थ !! ऍड. रोहित एरंडे. © मागील लेखात आपण वडिलोपार्जित मिळकती आणि मुलींचा हक्क ह्याबाबत माहिती घेतली. ह्या लेखात स्वकष्टार्जित मिळकतींबाबत आपण थोडक्यात माहिती घेऊ. "ब्रेकिंग न्यूज" मुळे एखाद्या निकालाचा कसा गैर अर्थ काढला जाऊ शकतो, ह्याचे हा निकाल एक ज्वलंत उदाहरण आहे. वडील जर मृत्युपत्र न करता मरण पावले तर त्यांचा एकमेव वारस असलेल्या त्यांच्या एकुलत्याएक मुलीला वडिलांची सर्व मिळकत मिळेल का ? आणि ती मुलगी सुद्धा मृत्यूपत्र न करता आणि निपुत्रिक मरण पावली तर तिच्या मिळकतीचे वाटप कसे होईल ? हे प्रश्न मा. सर्वोच्च न्यायालयापुढे उपस्थित झाले . मात्र 'ब्रेकिंग न्यूज' च्या उत्साहामध्ये 'वडिलांच्या सर्वच स्वकष्टार्जित मिळकतींमध्ये फक्त मुलींनाच अधिकार मिळेल आणि भावांना - मग त्यात सख्खे देखील आले - काहीच अधिकार नाही' अश्या आशयाचे चुकीचे काही महिन्यांपूर्वी मेसेजेस फिरू लागले. सबब ह्या लेखाच्या निमित्ताने ह्या निकालाचा आणि ...