"घर घेण्याआधी काय काळजी घ्याल ?" ऍड. रोहित एरंडे. ©
"घर घेण्याआधी काय काळजी घ्याल ?" ऍड. रोहित एरंडे. © घर पहावे बांधून आणि लग्न पहावे करून आपल्याकडे म्हण आहे. थोडक्यात ह्या दोन्ही महत्वाच्या गोष्टी करण्यापूर्वी घेणे अत्यंत महत्वाचे अन्यथा तुम्हालाच. स्वतःचे घर असावे अशी बहुतेक सगळ्यांची महत्वाकांक्षा आयुष्यात असते आणि ह्या साठी प्रत्येक जण आपापल्या परीने प्रयत्न करत असतो. सध्याच्या काळात वाढती लोकसंख्या आणि उपलब्ध जागा ह्यांचे प्रमाण व्यस्त झाले आहे. त्याचबरोबर "मायक्रो" कुटुंब पद्धतीमुळे एका कुटुंबाची छोटी छोटी कुटुंबे होत आहेत आणि त्यामुळेही जागेच्या मागणीत आणि पर्यायाने किंमतीत वाढ झाली आहे. ह्या परिस्थितीत आपल्या कष्टाचा पैसा - आयुष्यभराची पूंजी गुंतवून स्वतःच्या घराचे स्वप्न पूर्ण हे निर्धोक पणे पूर्ण व्हावे आणि आपली फसवणूक होऊ नये ह्या साठी प्रत्येकाने काळजी घेणे गरजेचे आहे. हा विषय खूप मोठा आणि महत्वाचा असल्यामुळे त्यावर विस्तृतपणे आणि सविस्तर लिहिणे गरजेचे आहे. परंतु या "जागेचे" बंधन असल्यामुळे नवीन घर घेण्या बाबतीत थोडक्यात पण महत्वाची माहिती देण्य...