वडिलोपार्जित मिळकतीमध्ये मुलींचा समान हक्क आहे. : ऍड. रोहित एरंडे. ©
वडिलोपार्जित मिळकतीमध्ये मुलींचा समान हक्क आहे. सर, आम्ही २ बहिणी आणि २ भाऊ आहोत. आमची वडिलोपार्जित मिळकत बरीच आहे. परंतु आम्हा दोन्ही बहिणींचा विवाह १९९४ पूर्वी झाल्यामुळे आता आमचे भाऊ वडिलोपार्जित मिळकतीमध्ये आमचा हक्क उरला नाही असे सांगत आहेत. ह्या बाबतीत इंटरनेट वर खूप उलट सुलट माहिती मिळाली. तरी कृपया आम्हाला वडिलोपार्जित मिळकतींमध्ये हक्क आहे का नाही हे सांगावे ? २ सख्ख्या बहिणी, पुणे. आपल्यासारखे प्रश्न आजही अनेक ठिकाणी दिसून येतात. "कायद्यापुढे सर्व समान" ह्या मूलभूत तत्वाला अनुसरून केंद्र सरकारने हिंदू वारसा कायदा १९५६ मध्ये २००५ साली विविध दुरुस्त्या केल्या ज्यायोगे वडिलोपार्जित मिळकतींमध्ये मुलींना मुलांप्रमाणेच समान हक्क मिळण्यासाठी कलम ६ मध्ये महत्वाचे फेरबदल केले आणि ही दुरुस्ती अंमलात येण्यासाठी ०९/०९/२००५ (ऑन अँड फ्रॉम|) हि तारीख मुक्रर केली गेली. मात्र ह्या दुरुस्तीचा अंमल हा पूर्वलक्षी प्रभावाने (रिट्रोस्पेक्टिव्ह ) करायचा का ०९/०९/२००५ या तारखेपासून म्हणजेच प्रोस्पेक्टिव्ह समजायचा यावरून बरा...