पुनर्विकास कराराच्या आधीच जागा सोडण्याची सक्ती करता येते का ? खिडक्यांचे ग्रील, लोखंडी दरवाजे ह्यावर हक्क बिल्डरचा का सभासदांचा ? - ॲड. रोहित एरंडे ©
पुनर्विकास कराराच्या आधीच जागा सोडण्याची सक्ती करता येते का ? खिडक्यांचे ग्रील, लोखंडी दरवाजे ह्यावर हक्क बिल्डरचा का सभासदांचा ? कराराच्या अटी का महत्वाच्या ? आम्ही सर्व सत्तर वर्षांच्या पुढचे ज्येष्ठ नागरिक असून सुमारे ५० वर्षांपासून इमारातीमध्ये राहतोय. काही जणांची मुले-बाळेही दुसरीकडे राहतात. आता आमच्या इमारतीच्या पुनर्विकासाचे काम सुरु झाले आहे. मात्र कोणताही करार बिल्डर बरोबर झालेला नाही. असे असतानाही संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले म्हणून काही सभासदांनी फ्लॅटचा ताबा बिल्डरला दिला आहे आणि बाकीच्यांना नोव्हेंबर अखेर पर्यंत जागा खाली करण्यास सांगितले आहे . आम्ही आमच्या सेफ्टीसाठी लोखंडी दरवाजे आणि खिडक्यांना ग्रील बसविले आहेत, असे आमचे म्हणणे आहे तर सोसायटी पदाधिकारी आमच्यावर दबाव आणत आहेत कि हे दरवाजे आणि ग्रील हे बिल्डरची मालमत्ता आहे, तुम्ही ती काढून घेऊन जाऊ शकत नाहीत. कृपया ह्याबद्दल मार्गदर्शन करावे. त्रस्त सभासद, मुंबई उपनगर. सोसायटी आणि सभासद ह्यांमध्ये कुठले वाद कधी नि...