Posts

Showing posts from November 22, 2023

सोसायटीमध्ये जागा उपलब्ध असल्यास ती सोलर पॅनेलसाठी देणे सोसायटीवर बंधनकारक. - ऍड. रोहित एरंडे ©

  सोसायटीमध्ये  जागा उपलब्ध असल्यास ती सोलर पॅनेलसाठी   देणे सोसायटीवर बंधनकारक.  ऍड. रोहित एरंडे © आमच्या बिल्डिंगच्या कॉमन टेरेसवरती  मला  गरम पाण्यासाठी तसेच विजेसाठी  सोलर पॅनल बसवायचे आहे. कारण मी सोसायटीला विनंती केली होती कि आपण सर्वांसाठी असे पॅनल बसवून घेऊ त्याचा सगळ्यांना फायदा होईल , पण त्याला सोसायटी मान्यता देत नाही. तर मी स्वतःसाठी असे सोलर  पॅनल सामायिक गच्चीवर बसवू शकतो का ? एक सभासद, पुणे.  सौर ऊर्जा प्रणाली म्हणजेच सोलर सिस्टीम हि आता बहुतेक ठिकाणी विशेष करून गरम पाण्यासाठी  वापरली जाते आणि काही मोठ्या सोसायट्यांमध्ये वीज-निर्मितीसाठीही तिचा वापर होतो.  आदर्श उपविधी मध्ये सौर ऊर्जा प्रणाली साठी स्वतंत्र नियम आहे. नियम १७० प्रमाणे एक किंवा अनेक सभासदांना सौर ऊर्जेची उपकरणे गच्चीवर इतकेच नव्हे तर इमारतीच्या अन्य भागावर बसवायची असतील आणि त्यासाठी जागा उपलब्ध असेल तर संबंधित सदस्यास अशी उपकरणे बसवायची परवानगी समिती देऊ शकते. ह्याच नियमामध्ये पुढे जाऊन सौर ऊर्जा यंत्रणा म्हणजे काय हे नमूद करताना त्यामध्ये सोलर कलेक्टर स्टँड , गरम आणि थंड पाण्याची टाकी, टाकीचा स्टॅन्ड, गरम