Posts

Showing posts from January 17, 2021

अपार्टमेंट - सोसायटी आणि कन्व्हेयन्स, सभासदत्व इ. : समज -गैरसमज ... ऍड . रोहित एरंडे ©

 अपार्टमेंट - सोसायटी आणि कन्व्हेयन्स, सभासदत्व इ. : समज -गैरसमज ...  ऍड . रोहित एरंडे © सध्या सोसायटी डीम्ड कन्व्हेयन्स बद्दल  सरकारतर्फे उपक्रम हाती घेण्यात आला आहे, परंतु ह्या तरतुदी अपार्टमेंट बाबत लागू होतात का ह्याबद्दल बरेच गैरसमज दिसून येतात.  आजही पुण्यासारख्या ठिकाणी बहुतांश सोसायट्यांचा कन्व्हेयन्स झालेला दिसून येत नाही. कन्व्हेयन्सचा अर्थ एखाद्या जागेमधील मालकी हक्क दुसऱ्याच्या नावे तबदील  करणे, थोडक्यात खरेदी खत असे म्हणता येईल. भारतामध्ये 'ड्युअल ओनरशिप' हि पद्धत आहे, म्हणजेच जमिनीचा मालकी हक्क एकाकडे  आणि त्यावरील इमारतीची मालकी दुसऱ्याकडे असू  असते, तर बहुतांश  पाश्चात्य देशांमध्ये ज्याच्या मालकीची जमीन तोच त्यावरील इमारतीचा देखील मालक होतो. तर, आपल्याकडे सहसा अशी पद्धत असते, कि जमीन मालक बिल्डर  बरोबर डेव्हलपमेंट ऍग्रिमेंट करतो ज्यायोगे  बिल्डर बिल्डिंग बांधतो. त्याच दरम्यान   कायद्याप्रमाणे युनिट / फ्लॅट विकत घेणाऱ्यांबरोबर बिल्डरला लेखी करारनामा करणे क्रमप्राप्त असते. नंतर  सोसायटी किंवा अपार्टमेन्ट स्थापन करण्याची  जबाबदारी बिल्डरवरती असते.   सोसायटी असेल तर