खोट्या वैद्कयकीय प्रमाणपत्रावर क्लेम फेटाळल्यामुळे इन्शुरन्स कंपनी आणि डॉक्टर , दोघांना राष्ट्रीय ग्राहक मंचाचा दणका :ऍड. रोहित एरंडे
खोट्या वैद्कयकीय प्रमाणपत्रावर क्लेम फेटाळल्यामुळे इन्शुरन्स कंपनी आणि डॉक्टर , दोघांना राष्ट्रीय ग्राहक मंचाचा दणका : ऍड. रोहित एरंडे © सध्याच्या काळात विविध कारणांमुळे वाढलेला हॉस्पिटलच्या खर्चाचा भार वैद्यकीय विम्यामुळे म्हणजेच मेडिकल इन्शुरन्स मुळे हलका होतो. मात्र इन्शुरन्स क्लेम नाकारल्यास पॉलिसी धारक आणि इन्शुरन्स कंपनी ह्यांच्यामध्ये नेहमीच वाद होत असतात. जर का खोटी माहिती दिली किंवा पूर्वीच्या आजाराची इ. महत्वाची माहितीच दडवून ठेवल्यास इन्शुरन्स कंपनीने क्लेम फेटाळल्यास आपण समजू शकतो. परंतु कंपनीनेच गैर-मार्गाचा अवलंब करून क्लेम नाकारल्यास कोर्टाने कंपनीला जबरी दंड केल्याची घटना नुकतीच घडली. "आयसीआयसीआय प्रुडेन्शिल लाईफ इन्शुरन्स कं . विरुद्ध दत्तात्रय गुजर" (रिव्हिजन अर्ज क्र. ३८५८/२०१७) या याचिकेवर नुकताच निकाल देताना राष्ट्रीय ग्राहक आयोगाने सदरील इन्शुरन्स कंपनी आणि डॉक्टर ह्यांना चांगलाच दणका दिला आहे. ह्या केसची थोडक्यात हकीकत बघुयात. तक्रारदाराने २००८ मध्ये " आयसीआयसीआय प्रु-हॉस्पटिल केअर पॉ...