Posts

Showing posts from October 25, 2022

जागा भाड्याने दिल्यास जास्तीचा देखभाल खर्च किती आकारता येतो ? ऍड. रोहित एरंडे. ©

  जागा भाड्याने दिल्यास जास्तीचा देखभाल खर्च किती आकारता येतो?  ऍड. रोहित एरंडे. © सोसायटी मधील मालक आणि भाडेकरू यांमध्ये साधारण किती तफावत किंवा किती टक्के जास्त मेंटेनन्स, सोसायटी नियमाप्रमाणे घेऊ शकते? कारण आमच्या सोसायटी मध्ये भाडेकरू कडून 50% जास्त मेंटेनन्स आकारला जातो. ह्यावर काही नियम असतील तर प्लीज सांगू शकता का? श्री. योगेश कुलकर्णी एखाद्या जागामालक - सभासदाने  तिऱ्हाईत व्यक्तीस जागा भाड्याने दिली असेल, तर त्या  सभासदाकडून   ना-वापर शुल्क म्हणजेच Non Occupancy Charges आकारण्याचा  सोसायटीला अधिकार आहे. अर्थात  एखाद्या सभासदाने स्वतः जागा न वापरता कुलूप लावून बंद ठेवली असेल, तर त्याकडून ना-वापर शुल्क घेता येत नाही, पण नियमाप्रमाणे  मेंटेनन्स मात्र  घेता येतो.  अश्या  ना-वापर शुल्काची आकारणी   मनमानी पद्धतीने होऊ  लागली म्हणून  महाराष्ट्र सरकारने सहकार कायद्याच्या कलम ७९-अ अन्वये ०१/०८/२००१ अध्यादेश काढून ना-वापर शुल्क हे देखभाल खर्चाच्या (maintenance charges  ) जास्तीत जास्त १० टक्केच आकारता  येईल असे स्पष्ट केले. 'हा अध्यादेश  घटनात्मक दृष्ट्या  वैध असल्याचा आणि सभासदाने त