Posts

Showing posts from August 12, 2020

मरावे, परी अवयवदानारूपी उरावे. ऍड. रोहित एरंडे. ©

मरावे, परी अवयवदानारूपी उरावे.  ऍड. रोहित  एरंडे.© १३ ऑगस्ट हा जागतिक अवयवदान दिवस म्हणून साजरा केला जातो, तर २७ नोव्हेंबर हा दिवस भारतीय अवयवदान दिवस म्हणून साजरा केला जातो, त्या निमित्ताने.... मानव वंशावर वैद्यक शास्त्राचे अनंत उपकार आहेत. "मला कुठल्याही संतापेक्षा भूलशास्त्राचा  शोध लावून वैद्यकीय शस्त्रक्रिया वेदानाहीन करणारा संशोधक अधिक मोठा वाटतो".हे पु. ल. देशपांडे ह्यांचे विधान म्हणूनच पटते. असाच एक महत्वाचा शोध आहे तो म्हणजे अवयवदान शास्त्र. अवयवदान ह्या वरदानामुळे अनेक लोकांचे जीवन सुसह्य तर झालेले आपण बघतो. दरवर्षी १३ ऑगस्टला अवयवदान दिवस साजरा केला जातो. ह्या महत्वाच्या विषया संदर्भातील  कायदेशीर बाबींबाबत थोडक्यात  माहिती आपण घेऊ.  असे  वाचनात आले कि दरवर्षी सुमारे ५ लाख लोक अवयव दान  न मिळाल्यामुळे तर सुमारे  २ लाख लोक लिव्हरच्या आजारामुळे मरतात , तर सुमारे १,५०,००० लोक किडनी ट्रांसप्लांट साठी प्रतीक्षेत असतात आणि या उलट केवळ ५००० व्यक्तींनाच अवयवदानाचा लाभ होतो, एवढे व्यस्त प्रमाण मागणी आणि पुरवठ्यामध्ये आहे. भारतामध्ये रोज मरणाऱ्या व्यक्तींची संख्या बघता त्यां