Posts

Showing posts from July 17, 2020

"प्रश्न ज्येष्ठ नागरिकांचे , त्यांच्या मिळकतींचे" ऍड. रोहित एरंडे ©

*"प्रश्न ज्येष्ठ नागरिकांचे , त्यांच्या मिळकतींचे"* *"मुलांना, आई-वडिलांच्या स्वकष्टार्जित  घरामध्ये आई-वडिलांच्या  मर्जीवरच राहता येते"* : ऍड. रोहित एरंडे © 'ढळला रे ढळला दिन सखया, संध्या छाया भिवविती हृदया ' ...  राजकवी भा.रा. तांबे ह्यांनी सुमारे १९३३ साली  लिहिलेल्या  अजरामर गाण्यातील ह्या ओळी आजही तितक्याच सत्य आहेत, हे  कोरोना लॉक डाउन च्या काळात घडलेल्या काही गोष्टींवरून आपल्याला नक्की पटेल.  *"ज्या देशात, आपल्या वृद्ध  आई-वडिलांना कावडीत  बसवून  खांद्यावरून काशीयात्रेला नेणारा श्रावण बाळ होऊन गेला, त्या देशात वृद्ध आई- वडिलांना स्वतःच्याच  घरातून मुलांनी बाहेर काढू नये म्हणून कोर्टाची दारे ठोठावयाला लागणे, हे दुर्दैवी आहे"* ह्या शब्दात नुकत्याच एका केसमध्ये  मा. मुंबई उच्च न्यायालायने एका ज्वलंत प्रश्नावर आपले मत व्यक्त केले आणि एका ७० वर्षीय महिलेला आपल्या पोटच्या पोरीकडून बेघर होण्यापासून वाचविले.  (संदर्भ : रजनी सोमकुंवर विरुद्ध सरिता सोमकुंवर, व्ही.सी. पिटिशन क्र . २८/२०२०), १९/०६/२०२०) ह्या ७० वर्षीय महिलेने मुलगी शारीरिक