"स्वतः पेशंटला न तपासता फोनवरून वैद्यकीय सल्लामसलत देणे हा वैद्यकीय निष्काळजीपणा" - मा. मुंबई उच्च न्यायालय !!
"स्वतः पेशंटला न तपासता फोनवरून वैद्यकीय सल्लामसलत देणे हा वैद्यकीय निष्काळजीपणा" - मा. मुंबई उच्च न्यायालय !! Adv. रोहित एरंडे डॉक्टरांना परमेश्वराचे दुसरे रूप असे संबोधले जात असले तरी डॉक्टर-रुग्ण ह्यांच्या नात्याची वीण दिवसेंदिवस सैल होत चालली आहे. कधी कधी मात्र पुढच्यास ठेच मागचा शहाणा ह्या उक्तीप्रमाणे काही प्रसंग ह्या नात्यामध्येही घडतात आणि त्याचा बोध ज्याचा त्यांनी घायचा असतो. हल्लीच्या धावपळीच्या दिवसात आणि कामाच्या धबडग्यामुळे काही लोक फोनवरून सल्ला घेतात आणि डॉक्टरही तो बरेचवेळा देतात देखील. ह्या मध्ये त्या दोघांचीही सोय असू शकेल. मात्र स्वतः रुग्णाची तपासणी न करता फोनवरून औषध सांगणे आणि त्यामुळे तो रुग्ण दगावणे , हा वैद्यकीय निष्काळजीपणा होऊ शकतो का असा गंभीर प्रश्न नुकताच मा. मुंबई उच्च न्यायालयापुढे नुकताच उपस्थित झाला. ह्या प्रश्नाचे होकारार्थी उत्तर देताना मुंबई उच्च न्यायालायने एका महत्वाच्या विषयाला वाचा फोडली आहे. डॉ. दीपा आणि डॉ.संजीव पावसकर विरुद्ध महाराष्ट्र सरकार (फौ. अ...