महिलांना स्टँम्प ड्युटी माफी, पण सरसकट नाही : ऍड. रोहित एरंडे ©
महिलांना स्टँम्प ड्युटी माफी, पण सरसकट नाही : ऍड. रोहित एरंडे © ८ मार्च हा दिवस जागतिक महिला दिवस म्हणून साजरा केला जातो. त्या अनुषंगाने या महिन्याच्या अंकात आपण महिलांना मुद्रांक शुक्ल (जनरल स्टँम्प ड्युटी) आणि न्यायालय शुल्क (कोर्ट फी स्टँम्प) मध्ये काही सवलतीच्या तरतुदी आहेत, त्याचा आढावा घेऊ. सर्वप्रथम हे लक्षात घ्यावे कि आपण बोली भाषेत जरी 'स्टँम्प' ड्युटी हा शब्द वापरात असलो तरी कायद्याच्या नजरेत याचे दोन प्रकार होतात. "मी तुला स्टॅम्प पेपर वर लिहून देतो" असे वाक्य जेव्हा आपण उच्चारतो तेव्हा त्याचा अर्थ हा मुद्रांक शुक्ल (जनरल स्टँम्प ड्युटी) असा होतो. उदा. मालमत्तेच्या व्यवहारांसाठी महाराष्ट्र मुद्रांक कायदा, १९५८ अन्वये जनरल स्टँम्प द्यावा लागतो. तर जेव्हा तुम्हाला कोर्टात कुठल्याही प्रकारचा दावा करायचा असेल, दाव्यामध्ये अर्ज करायचा असेल, मुदतीचा अर्ज द्यायचा असेल तर महाराष्ट्र कोर्ट फी कायदा १९५९ प्रमाणे कोर्ट-फी स्टँम्प भरावा लागतो, जो जनरल स्टँम्प पासून पूर्णपणे वेगळा आहे. कुठलीही स्टँम...