Posts

Showing posts from August 2, 2023

सभासदाला वर्गणीची सक्ती करता येणार नाही - ऍड. रोहित एरंडे ©

माझा प्रश्न असा आहे की, सोसायटीत उत्सव साजरे करण्यासाठी फंड जमा होतो तर  विकासकामांसाठी फंड जमा का होत नाही. म्हणून मी त्यांना उत्सव वर्गणी व भंडारा वर्गणी देण्यास मनाई केली. अश्या वर्गण्या देणे अथवा न देणे  हा  सर्वस्वी  माझा अधिकार आहे.  पण काही दाखले किंवा NOC मागायला गेल्यास उत्सव वर्गणी भरल्याशिवाय देत नाही. अश्या प्रकारची अडवणूक करण्यास सोसायटी पदाधिकाऱ्यांना अधिकार आहे का? मी सेवाशुल्क वेळेवर भरत असून देखील मला दाखले किंवा NOC केवळ  उत्सव वर्गणी भरत नसल्याने देण्यात येत नाही. याबद्दल कायदा काय सांगतो ? श्री. देवानंद खिलारी, नवी मुंबई कायद्याचे एक तत्व, विशेषतः सोसायट्यांच्या वादांबाबत  कायम लक्षात ठेवावे कि  "एखादी गोष्ट कायद्याने ज्या पद्धतीने करण्यास सांगितली आहे, ती त्याच पद्धतीने करावी अन्यथा अजिबात करू नये". हाऊसिंग सोसायट्या कोणत्या कारणासाठी आणि कोणत्या प्रमाणात सभासदांकडून पैसे (चार्जेस)  आकारू शकतात ह्याचे तपशीलवार वर्णन आदर्श उपविधी विभाग  क्र. IX मध्ये उपविधी क्र. ६५ ते ७१ मध्ये दिलेले आहे.ह्यांची विभागणी संस्थेचा खर्च आणि वेगवेगळे निधी (फंड ) उभारणे  अशी के