Posts

Showing posts from March 21, 2020

आपण ठरवतो एक आणि घडते दुसरेच.. ऍड. रोहित एरंडे. ©

आपण ठरवतो एक आणि घडते दुसरेच.. ऍड. रोहित एरंडे. © आपण ठरवतो एक आणि घडते दुसरेच.. अशी एक सत्यघटनेवर आधारित कथा. प्रथमेशची लग्न घटिका समीप आली. हो, प्रथमेश म्हणजे आमच्या फॅमिली फ्रेंड असलेल्या बेलसरे काका काकूंचा एकुलता एक मुलगा.. लाडा कोडात वाढलेला. शाळेत, कॉलेज मध्ये हुशार. नंतर अपेक्षेप्रमाणे Uncle Sam च्या देशात (म्हणजेच अमेरिका हो)  उच्च शिक्षणासाठी गेला आणि त्याला पाहिजे तशी नोकरी देखील त्याला मिळाली.. इकडे त्याच्या आई - वडिलांनी मुली कधी बघायच्या असा लकडा प्रथमेश च्या मागे सुरू केला. आधी त्याने टाळले,पण जेव्हा खूपच विचारणा होवू लागली, तेव्हा मात्र त्याने १५ मे ला , त्याच्या वाढ दिवसाच्या दिवशी जुई आणि त्याच्या नात्याबद्दल आई - वडिलांना सांगून टाकले. बेलसरे  काका काकू खुश झाले कारण एकतर चिरंजीव लग्नासाठी तयार झाले आणि जुई भालेराव तर प्रथमेश ची लहान पणापासूनची मैत्रीण, त्यांच्याच कॉलनीत राहणारी आणि अमेरिकेला पण दोघेही एकत्रच शिकत होते. जुईचेही आई वडील खुश झाली कारण लेक माहितगार आणि चांगल्या कुटुंबात जाणार होती. जुलै महिन्याच्या  पहिल्या आठवड्यात ती दोघे इकडे ये