समलैंगिक संबंधांना "सर्वोच्च" मान्यतेचा टप्पा पूर्ण, आता पुढचा टप्पा सामाजिक मान्यतेचा ?
समलैंगिक संबंधांना "सर्वोच्च" मान्यतेचा टप्पा पूर्ण, आता पुढचा टप्पा सामाजिक मान्यतेचा ? Adv. रोहित एरंडे दोन भिन्न लिंगी सज्ञान व्यक्तींमधल्या लैंगिक संबंधांबद्दल मोकळेपणाने बोलणे जेथे अजूनही "टॅबू" समजले जाते, त्या आपल्या देशात "दोन सज्ञान व्यक्तींमधील परस्पर संमतीने ठेवलेले समलैंगिक संबंध गुन्हा नाही" असा ऐतिहासिक निकाल मा. सर्वोच्च न्यायालयाच्या ५ सदस्यीय पूर्णपीठाने नवतेज सिंग जोहर आणि इतर विरुद्ध भारत सरकार आणि इतर, या याचिकेच्या निमित्ताने नुकताच दिला आणि एका नव्या अध्यायाला सुरुवात झाली. अर्थात या निकालाची बीजे मागील वर्षी सर्वोच्च न्यायालयाच्या ९ सदस्यीय खंडपीठाने दिलेल्या "राईट ऑफ प्रायव्हसी" या दुसऱ्या ऐतिहासिक निर्णयामध्येच रोवली गेली होती. त्या निकालामध्ये, २ सज्ञान व्यक्तींना त्यांचा लैंगिक जोडीदार निवडण्याचा घटनादत्त अधिकार आहे, असे मा. न्या. चंद्रचूड ह्यांनी सूतोवाच केले होते मा. सरन्यायाधीश दीपक मिश्रा ह्यांनी त्यांचा आणि न्या. अजय खानविलकर ह्...