Posts

Showing posts from June 9, 2023

नॉमिनी एक ठरविणे : सोसायट्यांपुढील नेहमीचा प्रश्न : ॲड. रोहित एरंडे. ©

प्रश्न : आमच्या सोसायटीमधील  दोन सभासदांचे निधन झाले आहे. त्यापैकी  एका सभासदाने मृत्यूपूर्वी त्याच्या पुतण्याच्या  नावे नॉमिनेशन करून दिलेले आहे, त्यावर मुलाने आक्षेप घेतला आहे..दुसऱ्या सभासदाने  नॉमिनेशन फॉर्म भरून ठेवला होता पण आम्हाला दिलेला नाही.   तर या दोन्ही प्रकारात वारस नोंद कशी करावी ?  सोसायटी पदाधिकारी , मुंबई   उत्तर : सोसायटीमध्ये  मूळ सभासद मयत झाल्यानंतर त्याच्या वारसांमध्ये आणि नॉमिनी मध्ये बऱ्याचदा वाद निर्माण होतात आणि अश्यावेळी सोसायटी कमिटीपुढे ह्या वादाचे निरसन कसे करायचे असा प्रश्न निर्माण होतो. ह्या पार्श्वभूमीवर मा. मुंबई उच्च न्यायालयाने 'करण खंडेलवाल विरुध्द वैकुंठ (अंधेरी) को. ऑप. सोसायटी (रिट याचिका क्र. १२४६८/२०२२), या याचिकेवर नुकताच एक महत्वपूर्ण निकाल देऊन ह्या बाबतीतील कायदा परत एकदा स्पष्ट केला आहे आणि ह्याचा फायदा सोसायटी आणि सभासद दोघांना होणार आहे.   याा  निकालाचे सार खालीलप्रमाणे, ज्यामुळे तुमच्या दोन्ही प्रश्नांची उत्तरे मिळतील.   १. सभासदत्व आणि मालकी हक्क ह्या दोन वेगळ्या गोष्टी. मूळ सभासदाने केलेल्या नॉमिनेशननुसार सोसायटीने सदस्यत्व देणे