Posts

Showing posts from December 16, 2022

माझे वारस नेमके कोण ? ऍड. रोहित एरंडे. ©

*माझे वारस नेमके कोण ? आणि मी कोणाचा वारस होऊ शकतो ?* *हिंदू स्त्री पुरुषांच्या  स्वकष्टार्जित  मिळकतीची विभागणी कशी होते ? 'सर्वोच्च' निकाल आणि मिडीयाने लावलेला अर्थ !!*  *ऍड. रोहित एरंडे. ©* "ब्रेकिंग न्यूज" मुळे  एखाद्या निकालाचा कसा गैर अर्थ काढला जाऊ शकतो, त्याचप्रमाणे व्हाट्सअप विद्यापीठावरील बातम्यांवर विश्वास ठेवण्याआधी पूर्ण खात्री करणे का गरजेचे , ह्याचे हा निकाल एक ज्वलंत उदाहरण आहे. वडील जर मृत्युपत्र न करता मरण पावले तर त्यांचा एकमेव वारस असलेल्या त्यांच्या  एकुलत्या एक मुलीला वडिलांची सर्व  मिळकत मिळेल का ?  आणि ती मुलगी सुद्धा मृत्यूपत्र न करता आणि  निपुत्रिक मरण पावली तर तिच्या मिळकतीचे वाटप कसे होईल ? हे प्रश्न मा. सर्वोच्च न्यायालयापुढे उपस्थित झाले. मात्र 'ब्रेकिंग न्यूज' च्या उत्साहामध्ये  'वडिलांच्या सर्वच स्वकष्टार्जित मिळकतींमध्ये फक्त मुलींनाच अधिकार मिळेल आणि भावांना - मग त्यात सख्खे देखील आले - काहीच अधिकार नाही' अश्या आशयाचे चुकीचे  काही महिन्यांपूर्वी  मेसेजेस फिरू लागले. सबब ह्या लेखाच्या निमित्ताने ह्या निकालाचा आणि संबंधि