ट्रान्सफर-फी पोटी अवास्तव रक्कम उकळणे बेकायदेशीर - ऍड. रोहित एरंडे. ©
ट्रान्सफर-फी पोटी अवास्तव रक्कम उकळणे बेकायदेशीर आमच्या सोसायटीमधील आमचा प्लॉट आणि त्यावरील बंगला आम्ही विकणार आहोत आणि त्याची बोलणी चालू आहेत. मात्र आमची सोसायटी ट्रान्स्फर फी पोटी जी रक्कम मागत आहे ती काही लाख रुपये एवढी होत आहे व परत पावती मात्र डोनेशनची देऊ असे सांगत आहेत. या बद्दल इंटरनेट वरील माहिती घेतली असता नीटसा बोध होत नाही. तरी याबद्दल कृपया मार्गदर्शन करावे. एक वाचक, पुणे . उत्तर : प्रश्नावर ह्या पूर्वीही अनेकवेळा लिहून आले आहे तरीही सोसायटीमध्ये असा मनमानी कारभार चालत असेल तर याला कायद्याचे अज्ञान म्हणायचे का कायद्याची भिती उरली नाही हेच समजत नाही. जे प्रत्यक्षपणे करता येत नाही ते अप्रत्यक्षपणे करणे असाच काहीसा हा प्रकार आहे. सोसायटीमधील सदनिका विकताना सभासदत्व हस्तांतरण शुल्क म्हणजेच ट्रान्सफर फी पोटी भरमसाट रकमा आकारल्या जाण्यावरून अनेक तक्रारी आल्यामुळे महाराष्ट्र शासनाने दि. ०९/०८/२००१ रोजी काढलेल्या अध्यादेशाप्रमाणे जास्तीत जास्त रु. २५,०००/- सभासदत्व ट्रान्सफर फी आकारता येईल असे स्पष्ट केले आहे आणि सदर...