सोसायटी मधील गोंगाट , आवाज.. कायदा काय सांगतो ? - ॲड. रोहित एरंडे. ©
आमच्या खालच्या फ्लॅट मधील सभासद खूप मोठ्यांदा गाणी, टिव्ही लावून ठेवतात. बिल्डिंग मध्ये काही वयस्कर आणि आजारी सदस्य आहेत, त्यांना ह्याचा खूप त्रास होतो. इतर सभासद पण त्रस्त झाले आहेत. आवाज कमी करा अशी विनंती केेली तर "आमच्या घरात आम्ही काहीही करू' म्हणून दमदाटी करतात. तसेच त्यांच्या राजकीय ओळखी असल्याने कोणी उघडपणे तक्रार करायला धजावत नाही. ह्या बाबतीत काय कारवाई करता येईल ? काही सभासद, औरंगाबाद ध्वनिप्रदूषणाला 'सायलेंट किलर' म्हणतात कारण त्यामुळे शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य बिघडते, आणि हो, प्रदूषण करणाऱ्याचेही बिघडते. "शेजाऱ्यांनी मोठ्यांदा लावलेला रेडिओ हा आपल्यासाठीच लावला आहे असा समज करून घेतला कि आपला त्रास कमी होतो" असे पु. ल. देशपांडे म्हणून गेले आहेत. ह्यातील गंमतीचा भाग सोडला तरी त्यांच्या वेळचा तो काळ आणि तो ऐकावा वाटणारा रेडिओ कधीच लुप्त झाले आहेत. असो. आपल्या वागणुकीमुळे दुसऱ्यांना त्रास होऊ नये, हे नागरिकशास्त्रामधील मूलभूत तत्व आहे. परंतु शाळा सुटली तरी नागरिकशास्त्र सोडायचे नसते हे दुर्दै...