Posts

Showing posts from November 23, 2019

राष्ट्रपती राजवट म्हणजे काय आणि काय नाही ? . ऍड. रोहित एरंडे. पुणे ©

राष्ट्रपती राजवट  म्हणजे काय  आणि काय नाही ?  . ऍड. रोहित एरंडे. पुणे © निवडणुक निकालानंतर सत्ता स्थापनेसाठी आवश्यक असलेले बहुमत कोणत्याच पक्षाला यश न आल्यामुळे अखेर महाराष्ट्रामध्ये 'राष्ट्रपती राजवट मागील आठवड्यात लागू झाली आणि एका वेगळ्या पर्वाला  सुरुवात झाली.  आपण ज्यांना बहुमताने निवडून दिले ते राजकिय पक्ष आपापसातील मतभेदांमुळे सरकार स्थापन न करू शकल्यामुळे आणि जे पक्ष एकमेकांचे  कट्टर प्रतिस्पर्धी म्हणून ओळखले जातात ते एकत्र येण्याची शक्यता निर्माण झाल्यामुळे मतदारांमध्ये नाराजी पसरणे स्वाभाविक आहे आणि परत एकदा राजकारणाचा रंग हा  काळा  किंवा पांढरा   नसून करडा (ग्रे)असतो हे परत एकदा सिद्ध झाले. परंतु सध्या सोशल मिडियाच्या  वेगाने वाऱ्याच्या वेगालाही मागे टाकले आहे असे म्हणावे लागेल. दुधारी शस्त्र असलेल्या ह्या सोशल मिडीयावर बऱ्याच वेळा चांगल्या किंवा वाईट अश्या दोन्ही गोष्टींमधले गांभीर्यच निघून जाते कि काय असे वाटायला लागते. राष्ट्रपती राजवट म्हणजे जणू काही आणीबाणीच लागू झाली आहे आणि महाराष्ट्रावर खूप मोठे संकट आले आहे आशयाचे मेसेजस, मिम्स   मोठ्या प्रमाणात व्हायरल