विकास महत्वाचा का पर्यावरण ? -ऍड. रोहित एरंडे.©
विकास महत्वाचा का पर्यावरण ? ऍड. रोहित एरंडे. © "आरे " प्रकरणामुळे विकास महत्वाचा का पर्यावरण संवर्धन हा मुद्दा परत एकदा उफाळून आला. निवडणुकांमध्ये देखील सोशल मिडीयावर राफेल सारखाच हाही मुद्दा तापला होता. "आरे " वृक्षतोडीमुळे पर्यावरणाची हानी होऊन प्रदूषण वाढणार, का तुलनेने कमी संख्यने वृक्ष तोड करावी लागली तरी त्यामुळे मार्गी लागणाऱ्या मेट्रो प्रकल्पामुळे आपोआप "कार्बन फूटप्रिंट" कमी होऊन प्रदूषणही कमी होणार , ह्या भोवती चर्चा फिरत होते. मात्र मा. सर्वोच्च न्यायालायने झाडे तोडण्यापुरताच स्थगिती आदेश देऊन मेट्रोशेडच्या बांधकामासाठी स्थगिती देण्यास नकार दिला आणि आता निकालासाठी प्रकरण इतर याचिकांबरोबर सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असल्यामुळे ह्या बद्दल अधिक बोलणे उचीत होणार नाही. परंतु प्रदूषण आणि कायदेशीर तरतुदी ह्यांची थोडक्यात माहिती आपण घेऊ या. सध्या मानव निर्मित वायु, जल, जमीन, ध्वनी अश्या प्रदूषणाच्या राक्षसाने ह्या पंचमहाभूतांचा समतोलच बिघवडवून टाकला आहे आण...