Posts

Showing posts from June 25, 2017

जेनेरिक औषधे - सक्ती - योग्य का अयोग्य ?

जेनेरिक औषधे - सक्ती - योग्य का अयोग्य ?   " प्रत्येक डॉक्टरांनी रुग्णांना औषध-चिट्ठीवर (प्रिस्क्रिप्टशन ) स्वच्छ आणि वाचता येईल अश्या अक्षरांमध्ये जेनेरिक औषधेच लिहून द्यावीत, अन्यथा डॉक्टरांविरुद्ध कारवाई केली जाऊ शकते " असा आदेश नुकताच मेडिकल कौन्सिल ऑफ इंडिया (एम.सी.आय ) , या भारतामधील वैद्यकीय शिक्षण आणि गुणवत्ता या बाबतीतील निकष ठरविणाऱ्या सर्वोच्च संस्थेने दि. २१/०४/२०१७ रोजीच्या परिपत्रकानुसार दिला आणि या मुळे सर्वत्र आणि विशेष करून वैद्यकीय विश्वामध्ये खळबळ उडाली. आधीच सध्या डॉक्टर - रुग्ण यांच्या मधील तेढ वाढत आहे, त्या मध्ये हे आदेशरूपी तेल ओतले गेले आहे. ह्या पूर्वी एम.सी.आय ने "शक्यतो" जेनेरिक औषधे लिहून द्यावीत असा आदेश दिला होता, त्यात वरील बदल करण्यात आला.  सर्वप्रथम आपण जेनेरिक औषधे म्हणजे काय हे थोडक्यात समजावून घेऊ.  कुठलेही डॉक्टर रुग्णाची तपासणी करून झाल्यावर रुग्णास औषध लिहून देतात. त्या वेळी आपण बाजारात उपलब्ध असलेल्या औषधांच्या "ब्रँड" नावावरून ती औषधे खरेदी करतो. मात्र त्या औषधामधील मूळ घटक / औषधाचे नाव आपल्याला म