Posts

Showing posts from April 9, 2024

सोसायटी रिडेव्हलपमेंटसाठीची मार्गदर्शक तत्वे. ऍड. रोहित एरंडे ©

 सोसायटी रिडेव्हलपमेंटसाठीची मार्गदर्शक  तत्वे.    ऍड. रोहित एरंडे ©   पारदर्शकता हा रिडेव्हलपमेंटचा गाभा आहे आणि या संदर्भात अनेक तक्रारी आल्यामुळे  ४ जुलै २०१९ रोजी तत्कालीन महाराष्ट्र  सरकारने सहकार कायदा कलम ७९ (अ )   सोसायटीसंदर्भातील रिडेव्हलपमेंटसाठीची /पुनर्विकासासाठीची सुधारीत  रिडेव्हल्पमेंट प्रकल्प अहवाल आणि कार्यवाही : आर्किटेक्ट / प्रकल्प व्यवस्थापक सल्लागार ह्यांनी  सर्व सरकारी नियम,  अटी, सभासदांच्या अटी -सूचना ह्यांचा विचार करून तयार केलेला  अहवाल त्यांच्या नियुक्तीच्या दिनांकापासून २ महिन्यात मॅनेजिंग कमिटीकडे सादर करावा. असा अहवाल प्राप्त झाल्यावर सेक्रेटरी, मॅनेजिंग कमिटीच्या सभेचे आयोजन करतील. ह्या सभेची सूचना सभासदांनाही देण्यात यावी जेणेकरून त्यांना सूचना देता येतील. ह्या सभेमध्ये आर्किटेक्ट / प्रकल्प व्यवस्थापक सल्लागार हजर  राहून चर्चेअंती आवश्यक ते बदल करून  प्रकल्प अहवालास बहुमताने  मान्यता देण्यात येईल. तद्नंतर निविदा मसुदा तयार करण्याचे काम सुरु होईल. निविदा मसुदा तयार करताना...