अविवाहित व्यक्तींच्या मिळकतीचे विभाजन.. ऍड. रोहित एरंडे. ©
आम्ही दोघे सख्खे बहीण भाऊ आहोत आणि वय ६० च्या पुढे आहे. आमचे आई-वडील आता हयात नाहीत आणि आम्ही दोघेही अविवाहित आहोत. तर आमच्या मृत्युनंतर आमच्या दोघांच्या स्वकष्टार्जित मिळकतीचे विभाजन कसे होईल ? एक वाचक, पुणे. *ऍड. रोहित एरंडे. ©* मिळकतीमधील हक्क आणि अधिकार या बाबत आपल्याकडे अजूनही म्हणावी तशी जागृती झालेली दिसून येत नाही. एखाद्या मिळकतीमध्ये मालकी हक्क हा व्यक्तींच्या हयातीमध्ये खरेदीखत, बक्षीसपत्र, हक्कसोड पत्र, वाटप-पत्र यांसारख्या नोंदणीकृत दस्तानेच तबदील होऊ शकतो . तर एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्याच्या मिळकतीमधील मालकी हक्क हा मृत्यूपत्राने (टेस्टमेंटरी सक्सेशन) किंवा मृत्यूपत्र केले नसेल तर वारसा हक्काने (इंटेस्टेट सक्सेशन ) तबदील होऊ शकतो. खरेदीखत, बक्षीसपत्र , मृत्युपत्र ह्यायोगे मिळालेली मिळकत हि त्या व्यक्तीची स्वकष्टार्जित / स्वतंत्र मिळकत धरली जाते. तर एखादा हिंदू पुरुष आणि स्त्री मृत्यूपत्र न करता मरण पावले तर त्यांच्या स्वकष्टार्जित संपत्तीची विभागणी वेगवेगळ्य...