ग्राहकाच्या संमतीशिवाय शेअर्स परस्पर विकले - कोर्टाचा ब्रोकरला दणका. ऍड. रोहित एरंडे. ©
ग्राहकाच्या संमतीशिवाय शेअर्स परस्पर विकले - कोर्टाचा ब्रोकरला दणका ऍड. रोहित एरंडे. © शेअरच्या खरेदी-विक्रीचे व्यवहार हे आता डिमॅट अकाऊंट शिवाय होत नाहीत. काही गुंतवणुकदार ग्राहक हे स्वतःच डिमॅट अकाऊंटचे व्यवहार करतात, तर बहुतांशी गुंतवणूकदार हे कुठल्यातरी शेअर-ब्रोकर मार्फत हे व्यवहार करतात. कुठले शेअर्स घ्यायचे -कुठले विकायचे, ह्याच्या इंस्ट्रक्शन्स ह्या बहुतेक वेळा तोंडी दिल्या जातात, पण तसे करण्याचा अलाहिदा करार हा ब्रोकर कंपनी आणि गुंतवणूकदार ह्यांच्या मध्ये झालेला असतो. आता काही ठिकाणी तर ऑर्डर द्यायचे- घ्यायचे कॉल रेकॉर्ड केले जातात. परंतु गुंतवणूकदाराला न विचारता ब्रोकरच्या कर्मचाऱ्याने पर्यायाने ब्रोकरने ,शेअर्सचे व्यवहार केले आणि त्यामध्ये जर का ग्राहकाचे नुकसान झाले तर ब्रोकर कंपनी आणि संबंधित कर्मचारी नुकसान भरपाई देण्यास बांधील राहतील का, ह्या प्रश्नाचे होकारार्थी उत्तर देताना राष्ट्रीय ग्राहक तक्रार निवारण मंचाने वामन उपासकर, गोवा विरुद्ध इंडिया इन्फोलाईन आणि इतर (र...