Posts

Showing posts from August 21, 2021

इन्शुरन्स आणि प्रिमियम भरण्याची जबाबदारी : काही लक्षात ठेवण्याजोगे ऍड. रोहित एरंडे.©

इन्शुरन्स आणि प्रिमियम भरण्याची जबाबदारी : काही लक्षात ठेवण्याजोगे  ऍड. रोहित एरंडे.© हल्लीच्या धकाधकीच्या जीवनात इन्शुरन्सचे मह्त्व आपण  सगळेच जाणतो, मग तो लाईफ इन्शुरन्स असो वा हेल्थ इन्शुरन्स किंवा गाडीचा. जो तो आपल्या गरजेप्रमाणे, कुवतीप्रमाणे इन्शुरन्स घेत असतो आणि त्या प्रमाणे त्याचा हप्ता /प्रिमियम ठरतो. असा हा  प्रिमियम वेळच्या वेळी भरणे खूप गरजेचे असते. आपल्या व्यस्त जीवनचर्येमुळे प्रिमियम भरण्यासाठी बऱ्याचवेळा  इन्शुरन्स एजंटांची मदत घेतली जाते. असे हे एजंट इन्शुरन्स कंपनी आणि ग्राहक ह्यांच्या मधला एक महत्वाचा दुवा असतो. पॉलीसीचा क्लेम रद्द होण्याची अनेक कारणे असतात,  परंतु काही कारणाने एजंटकडून इन्शुरन्स प्रिमियम विहित मुदतीमध्ये  भरला गेला नाही आणि इन्शुरन्स पॉलीसी रद्द झाली , तर दोष कोणाचा ? हे लिहिण्याचे कारण म्हणजे अजुनही असे प्रकार काही प्रमाणात घडत असतात आणि ह्या संबंधीचा कायदा पाहिल्यास इन्शुरन्स ग्राहक म्हणून आपणच काळजी घेतली पाहिजे हे पुढील निर्णयावरून आपल्या लक्षात येईल.  ह्या बाबतीतला सगळ्यात गाजलेला आणि महत्वाचा निर्णय आहे मा. सुप्रीम कोर्टाने ,  हर्षद श