ई.व्ही. चार्जिंग पॉईंट -स्वतःचा वापरायचा का सोसायटी सांगेल तो ? - ऍड. रोहित एरंडे. ©
ई.व्ही. चार्जिंग पॉईंट -स्वतःचा वापरायचा का सोसायटी सांगेल तो ? प्रश्न : आमच्या सोसायटी मध्ये काही लोकांनी इलेक्ट्रिक दुचाकी /चारचाकी घेतल्या आहेत आणि हळू हळू हे प्रमाण वाढत जाणार ह्यात शंका नाही. मात्र आमच्या सोसायटी कमिटीने एका खासगी कंपनीला कॉमन चार्जिंग पॉईंट बसविला आहे आणि आता एक फतवा काढला आहे कि कोणत्याही सभासदाने स्वतःच्या मीटर मधून चार्जिंग पॉईंट साठी कनेशन घ्यायचे नाही, तर ह्या कॉमन चार्जिंग पॉईंटमधूनच कनेक्शन घ्यावे आणि ह्या कॉमन कनेक्शनचा विजेचा दरही वीज मंडळापेक्षा जास्त आहे. सोसायटीला विचारणा केल्यास त्यांचे म्हणणे आहे कि सगळ्यांनी स्वतःचे कनेक्शन घेतल्यास खूप वायरी होतील आणि ते चांगले दिसणार नाही, तर असा ठराव कमिटीला करता येईल का ? एक वाचक, पुणे . उत्तर : कुठलीही नवीन टेक्नॉलॉजी रुळेपर्यंत वेगवेगळ्या स्वरूपाच्या अडचणी ह्या येतातच आणि ईलेक्ट्रिक व्हेईकल (ई.व्ही.) ह्याला अपवाद नाही, हे आपल्या प्रश्नावरून दिसून येते. सर्व सभासदांनी सोसायटी ठरवेल त्याच एका कंपनीच्या डिश अँटिनामधून कनेक्शन घ्यावे, हे जसे सांगता येणार नाही त...