धडा डेबिट कार्डचा - नवरा - बायको एकमेकांचे कार्ड वापरू शकतात का ? कायदा काय म्हणतो.. ऍड. रोहित एरंडे ©
धडा डेबिट कार्डचा - नवरा - बायको एकमेकांचे कार्ड वापरू शकतात का ? कायदा काय म्हणतो.. ऍड. रोहित एरंडे © एटीएम मधून पैसे काढण्यासाठी स्वतःहून आपले डेबिट कार्ड आपल्या वैवाहिक जोडीदाराला देणे ही वरकरणी साधी वाटणारी गोष्ट चांगलीच महागात पडू शकते हे बेंगलोर येथे घडलेल्या एका केस वरून आपलयाला लक्षात येईल. सुमारे २०१४ चे हे प्रकरण दिसत असले, तरी त्याची बातमी नुकतीच सोशल मिडीयावर जोरदार व्हायरल झाली होती. बाळंतपणाच्या रजेवर असलेल्या वंदना नामक एका महिलेने तिच्या स्टेट बँकेमधील खात्यामधून रू.२५,०००/- काढण्यासाठी तिच्या नवऱ्याला, राजेशला, स्वतःचे डेबिट कार्ड अर्थातच पिन नंबरसह दिले. राजेशने जवळच्या एटीएम मध्ये जाऊन कार्ड स्वाईप केले आणि त्याला रू. २५,०००/- खात्यातून वर्ग झाल्याची स्लिप देखील मिळाली, परंतु प्रत्यक्षात पैसे मात्र काही मिळाले नाही. त्यामुळे राजेशने लगेचच बँकेच्या कॉल सेन्टरला फोन करून तक्रार नोंदवली आणि त्याला सांगण्यात आले कि एटीएम मशीन सदोष असल्...