Posts

Showing posts from December 6, 2019

सामाईक गच्ची आणि अधिकार : समज -गैरसमज. ऍड. रोहित एरंडे ©

सामाईक गच्ची आणि अधिकार : समज -गैरसमज  ऍड. रोहित एरंडे © मागील  लेखामध्ये आपण कॉमन पार्किंग आणि कव्हर्ड पार्किंग ह्याबद्दल माहिती घेतली. पार्किंग बरोबरच नेहमी वाद-विवाद होणार विषय म्हणजे  सामाईक गच्ची /टेरेस.  गच्ची हा विषय निघाला की मला पु. ल. देशपांडे ह्यांनी अजरामर केलेला "गच्चीसह झालीच पाहिजे" हा बटाट्याची चाळ ह्या पुस्तकातील लेख आठवतो. पण एवढे फुलके प्रसंग प्रत्यक्षात घडत नाहीत.. येथे एक महत्वाचा फरक लक्षात घेतला पाहिजे की टेरेस फ्लॅट म्हणजेच फ्लॅटला स्वतंत्ररीत्या जोडून असलेली टेरेस आणि कॉमन टेरेस ह्यामध्ये खूप फरक आहे. अश्या कॉमन टेरेसबद्दल देखील लोकांच्या मनामध्ये अनेक शंका, समज गैरसमज दिसून येतात.  ह्या बद्दलची थोडक्यात कायदेशीर माहिती आपण बघूया.  महाराष्ट्र ओनरशिप फ्लॅट्स ऍक्ट (मोफा) १९६३  रेरा कायदा यांच्यामध्ये बिल्डर-प्रमोटर ह्यांची कर्तव्ये , जबाबदाऱ्या आणि फ्लॅट ग्राहकांचे हक्क-अधिकार आणि ह्यांचा उहापोह केलेला आढळून येतो. त्यामध्ये कॉमन जागा, ऍमिनिटीज ह्यांचाही समावेश होतो. रेरा कायदा जरी पारित झाला असला तरी, मोफा कायदा त्याने रद्द झालेला नाही आणि म