एकत्र केलेल्या फ्लॅटसाठी किती मेंटेनन्स घ्यावा ? मेंटेनन्स आणि फ्लॅटचे कायदेशीर एकत्रीकरण . ऍड. रोहित एरंडे ©
एकत्र केलेल्या फ्लॅटसाठी किती मेंटेनन्स घ्यावा ? फ्लॅटचे कायदेशीर एकत्रीकरण झाले आहे का ? . नमस्कार. माझा प्रश्न असा आहे कि जर हौसिंग सोसायटी मध्ये एकाच कुटुंबाने दोन फ्लॅट घेऊन एकत्र करून त्यात एकच कुटुंब रहात असले तर सोसायटीने मेंटनन्स एकाच फ्लॅटचा घ्यावा कि दोनचा ? एक वाचक. सोसायटी आणि सभासद ह्यांच्यामधील वादांचे मूळ कारण हे बहुतेक वेळा आर्थिक विषयाशी संबंधित असते. आपण विचारलेल्या प्रश्नासारखी परिस्थिती अनेक ठिकाणी दिसून येते आणि ह्यामध्ये मेंटेनन्स आणि कायदेशीर एकत्रीकरण ह्या दोन पैलूंचा अंतर्भाव होतो. सोसायटीमध्ये जरी देखभाल खर्च सर्वांना समान पद्धतीने आकारला जायला पाहिजे तरी देखभाल खर्चात कशाचा समावेश होतो आणि कुठले खर्च कुठले एरिया प्रमाणे इ. आकारले जातात ह्याची तरतूद आदर्श उपविधी क्र. ६५ ते ६८ मध्ये दिलेली आहे. अनेक वेळा लोकांचा सोयीकरिता शेजारील फ्लॅट घेण्याचा किंवा त्याच इमारतीमधील दुसरा फ्लॅट विकत घेण्याकडे कल दिसून येतो. एकाच इमारतीमध्ये एकाच व्यक्तीचे दोन वेगवेगळे फ्लॅट असले तरी प्रत्येक फ्लॅटचा ...