मृत्युपत्राचा अंमल कधी सुरु होतो ? - ॲड. रोहित एरंडे. ©
सर, माझ्या वडिलांनी माझ्या नवे मृत्यूपत्र करून ठेवले आहे आणि त्या योगे सोसायटीमधील फ्लॅट माझ्या नावावर केला आहे. वडील अजून हयात आहेत. हे मृत्यूपत्र घेऊन मी सोसायटीमध्ये माझे नाव शेअर सर्टिफिकेटवर लावावे म्हणून अर्ज केला, तर मला आधी प्रोबेट आणायला सांगितले. तर प्रोबेटची गरज पुण्यात आहे का ? एक वाचक, पुणे. कायद्याचे अज्ञान किती ' कमाल ' आहे ह्याचे हे उत्तम उदाहरण आहे. (कमाल हा शब्द सर्व अर्थांनी घ्यावा !) आपल्याला मी धन्यवाद देतो कारण असे कमालीचे गैरसमज समाजात अनेक ठिकाणी आढळतात, ते १ टक्का दूर झाले तरी मी माझे नशीब समजेन... सर्व प्रथम तुमच्या प्रश्नाच्या पहिल्या भागाकडे येतो. *मृत्युपत्राचा अंमल कधी सुरु होतो ?* मृत्यूपत्र हे मृत्युपत्र करणारा बोलायचा थांबला कि बोलायचे थांबते म्हणजेच मृत्युपत्र करणारा मयत झाल्यावरच मृत्युपत्र अस्तितीवर येतो किंवा त्याचा अंमल सुरु होतो. मृत्युपत्र करणारा हयात असेस्तोवपर्यंत मृत्यूपत्र म्हणजे एक साधा कागद असतो !! मृत्युपत्र करणारा मृत्युपत्र कितीही वेळा बदलू शकतो किंवा त्याच्या हयातीमध्ये ती मिळकत तो विकून टा...