Posts

Showing posts from August 21, 2020

नवीन ग्राहक संरक्षण कायदा ग्राहकांच्या हिताचा.. ऍड. रोहित एरंडे. ©

नवीन ग्राहक संरक्षण कायदा ग्राहकांच्या हिताचा..                                                           ऍड. रोहित एरंडे. © "दुकानातील सर्वात दुर्लक्षीत गोष्ट कोणती असेल तर ती म्हणजे ग्राहक" असे पु.ल. देशपांडे यांनी एकाठिकाणी म्हंटले आहे. ह्यातील विनोदाचा भाग सोडून देऊ. एखादी गोष्ट उदा. टीव्ही, फ्रिज घेतला आणि ह्या वस्तू सदोष निघाल्या किंवा इन्शुरन्स कंपनीने विनाकारण क्लेम फेटाळला किंवा बिल्डरने फ्लॅटचा ताबा वेळेत दिला नाही   तर  अश्या सेवेमधील त्रुटींविरुद्ध   दाद मागण्यासाठी म्हणजेच ग्राहकांच्या हितासाठी, त्यांच्या  हक्कांच्या संरक्षणासाठी १९८६ साली पहिल्यांदा  ग्राहक संरक्षण कायदा   आणला गेला. मात्र हळू हळू वास्तू , सेवा त्यांचे आणि सेवेंचे स्वरूप ह्यात खूप बदल होत गेले, डायरेक्ट दुकानात न जाताही  ऑनलाईन पद्धतीने वस्तु सेवा विकत घेण्याच्या युगात आपण आलो आहोत आणि  त्यात बदल होणे क्रमप्राप्त होतेच. त्याच अनुषंगाने नवीन ग्राहक संरक्षण कायदा २०१९ पास करण्यात आला आणि त्या  मधील बहुसंख्य तरतुदी  २० जुलै २०२० पासून अंमलात आणल्या आहेत. अश्या ह्या महत्वपूर्ण बदलांची थोडक्यात माहित