Posts

Showing posts from April 20, 2020

कोरोनामुळे उद्भवले जागांच्या भाडे वसुलीचे आणि ताब्याचे वाद.. ऍड. रोहित एरंडे.©

कोरोनामुळे उद्भवले जागांच्या भाडे वसुली चे   आणि ताब्याचे  वाद..  ऍड.  रोहित एरंडे. ©  एखाद्या  शांत जलाशयात दगड मारल्यावर अनेक दृश्य -अदृश्य  तरंग उठतात, पण ते तात्पुरते असतात. पण कोरोनामुळे आपल्या सर्वांच्या जीवनात निर्माण झालेले तरंग दीर्घकाळ राहतील असे वाटते. . ह्या कोरोनारूपी महापुरात आपण लव्हाळे बनून राहणे आपल्या हिताचे आहे. अचानक आलेल्या ह्या महामारीमुळे लॉक -डाउन घोषीत करावा लागला आणि  जीव का उपजीविका असा प्रश्न सध्या आपल्या सर्वांपुढे उपस्थित झाला आहे.  ह्याचा प्रमुख परिणाम आर्थिक परिस्थितीवर होत आहे. केंद्र आणि राज्य सरकारे आपापल्या परीने मदत जाहीर करत आहेत.  कोरोनाच्या भीतीमुळे  मालकाने भाडेकरूंना जागा सोडण्यास सांगितले,  भाडेकरूंनी भाडे देण्यास नकार दिला,  काही ठिकाणी डॉक्टरांना सोसायट्यांमधील त्यांचे क्लिनिकच बंद करायला सांगितले, अश्या बातम्या हळू हळू डोके वर काढायला लागल्या. ह्या मध्ये भर पडली ती लाखो निर्वासित कामगारांनी भीती पोटी केलेले स्थलांतर. ह्या संदर्भात केंद्रीय मनुष्य बळ  विकास मंत्रालयाने दिनांक २९ मार्च रोजी परिपत्रक काढून असे नमूद केले आहे ज्या ठिका