Posts

Showing posts from December 23, 2022

पॉवर ऑफ ऍटर्नी - समज -गैरसमज. ऍड. रोहित एरंडे. ©

पॉवर ऑफ ऍटर्नी - समज -गैरसमज ऍड. रोहित एरंडे. © मुले परदेशी जाताना आई-वडीलांना, तसेच जागांच्या व्यवहारासाठी बिल्डरला देताना किंवा , मोठ्या अधिकाऱ्याने हाताखालच्या कनिष्ठ अधिकाऱ्यांना, अश्या अनेक बाबतीत पॉवर ऑफ ऍटर्नी दिल्याचे आपण बघीतले असेल. असा ह्या पॉवर ऑफ ऍटर्नी (पीओए) म्हणजेच कुलमुखत्यारपत्राबद्दल  लोकांमध्ये बरेच समज गैरसमज दिसून येतात. अश्या महत्वाच्या पण क्लिष्ट विषयाबद्दलच्या कायदेशीर तरतुदींची थोडक्यात माहिती बघू. पॉवर ऑफ ऍटर्नी ऍक्ट १८८२ आणि कॉन्ट्रॅक्ट ऍक्ट १८७२ मध्ये पॉवर ऑफ ऍटर्नी बद्दलच्या तरतुदी आढळून येतात. * आपल्या वतीने ठराविक गोष्टी करण्यासाठी दुसऱ्या व्यक्तीस दिलेले अधिकार पत्र म्हणजे पॉवर ऑफ ऍटर्नी अशी व्याख्या १८८२ च्या कायद्यामध्ये केलेली आढळते .*  मात्र पॉवर ऑफ ऍटर्नी देणारा आणि घेणारा ह्यांचे हक्क, कर्तव्ये, अधिकार ह्या बाबतीतल्या सर्व तरतुदी ह्या कॉन्ट्रॅक्ट ऍक्ट मधील कलम - १८२ ते २३८ मध्ये आढळून येतात. *ह्या कायद्याप्रमाणे जी व्यक्ती पॉवर ऑफ ऍटर्नी देते त्या व्यक्तीस "प्रिन्सिपल" तर जी व्यक्ती पॉवर ऑफ ऍटर्नी लिहून घेते त्या व्यक्तीस "एजंट"