Posts

Showing posts from March 22, 2023

जागा वापरासाठी मंजूर नकाशा हाच आधार, आणि, जादा ना वापर शुल्क घेता येणार नाही. ॲड. रोहित एरंडे ©

प्रश्न - मी ठाणे येथील एका रजिस्टर्ड सोसायटीच्या बिल्डींग मधे सहाव्या (शेवटच्या) मजल्यावर राहतो. फ्लॅट च्या एक खोलीला जोडुन बिल्डर ने बाहेरच्या बाजुला खाली आणि वर छज्जे बांधले आहेत जे सोसायटीच्या मंजुर आराखड्यात आहेत. मला त्या छज्जाला गॅलेरीतुन रस्ता काढुन, वर पत्रे ,खाली लाद्या आणि समोर जाळी लावुन गच्ची सारखा उपयोग करता येइल का? तसंच माझ्या फ्लॅट च्या हाॅल ला जोडुन आमच्याच सोसाटीच्या कमर्शियल विंगच्या लिफ्टरुमचं छत येत. त्याजागेला सुद्धा गॅलेरी तुन रस्ता काढुन, वर पत्रा आणि समोर जाळी लावुन गच्ची म्हणुन वापर करता येईल का? या दोन्ही जागांचा कोणालाही अडथळा होणार नाही तसंच सार्वजनिक उपयोगही होणार नाहीये किंवा कोणाचे नुकसानही होणार नाही का धोका निर्माण होईल. एक वाचक उत्तर : आपल्या प्रश्नांचे एकत्रित उत्तर "नाही" असेच द्यावे लागेल. आपल्याला सोयीची  वाटलेली प्रत्येक गोष्ट कायद्याला सोयीस्कर असतेच असे नाही. तुम्हाला जेवढी जागा मंजूर नकाशाप्रमाणे विकली आहे तेवढीच  जागा वापरण्याचा  अधिकार तुम्हाला पोहोचतो.  त्यामुळे तुम्ही असे कुठलेही बांधकाम केल्यास ते गैरकायदा ठरेल ह्याची नोंद घ्याव